बीफ बाळगल्याच्या संशयावरुन एका निष्पाप 72 वर्षीय इसमास रेल्वेत बेदम मारहाण

Date:

महाराष्ट्रातही युपी. बिहार सारखी दैयनिय अवस्था

ठाणे (बदलापुर विकास मिडिया) – भारतातील नागरिक मागील काही वर्षात अतिशय गंभिर स्वरुपाच्या समस्येतुन आपले जीवन जगत आहेत. राजकारणात ज्याप्रकारे विविध नेत्यांकडुन भडकाऊ भाषण करण्यात येते आणि विविध धर्मांमध्ये तेढ निर्माण होण्यासारखे भाषण करुन नवतरुणांना उत्तेजीत करण्यात येते यामुळे भारतातील नवी पिढी कशाप्रकारच्या अग्रेसिव्ह आणि विष मनात ठेवत ज्या दिशेकडे वाटचाल करत आहे ही चिंतेची बाब आहे. हे पुर्व फक्त यु.पी. बिहार आणि आसपासच्या राज्यात दिसत होते परंतु आता या काही वर्षात महाराष्ट्र राज्यात सुद्धा दिसायला मिळत आहे. 

सर्वधर्म समभाव ही महाराष्ट्राची संस्कृति असतांना मागील काही वर्षांत या राज्यात भडकाऊ भाषण, विविध जाती धर्मांबद्दल रोष आणि इतर गोष्टींवरुन दंगलीसारखी परिस्थिती पाहायला मिळाली. नुकताच असाच काहीसा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाले तेथे एका 72 वर्षीय वरिष्ठ नागरिकांना विनाकारण काही स्वयंघोषीत कार्यकर्त्यांनी बीफ बाळगल्याच्या संशयावरुन बेदम मारहाण करण्यास तसेच पिडीतेच्या धर्माबद्दल वाईट बोलुन दंगल भडकवण्यासारखा प्रकार केला.

72 वरिष्य़ भारतीय नागरिक हे मुस्लिम धर्माचे असुन दि. 30 ऑगस्ट रोजी ते जळगाव ते कल्याण येथे रेल्वेतुन प्रवास करत आपल्या मुलीला कोण गावात भेटण्यासाठी येत होते, परंतु काही स्वयंघोषीत धर्माचे रक्षण करणारे म्हणत त्यांना चुकीच्या संशयाने मारहाण केली. विशेष म्हणजे जेव्हा हे सगळा प्रकार घटना पोलिसांनी मात्र योग्य प्रकारे कलम लावत आरोपींविरोधात योग्य कारवाई न करता नॉन कॉग्नेजेबल गुन्हा दाखल केल्याने आरोपींची तेथून सुटका झाली.

याबाबत सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या सदस्यांना माहिती मिळाल्यानंतर पत्रकारांसह जेव्हा पोलिसांना जाब विचारणा करण्यात आले तेव्हा लोहमार्ग पोलिसांनी पिडीतेच्या मुलीची देखील विचारणा आणि तक्रार अर्ज दाखल करत विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केले आहे.

पिडीतेच्या जबाबानंतर लोहमार्ग पोलिसांनी तीन आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता कायद्याच्या कलम 189(2) अनैतिक समावेशी, कलम 191(2) दंगल घडवण्याच्या उद्देशाने, कलम 126(2) अनैतिक बाधा, कलम 190 अशांतता उत्पन्न करणे, कलम 115(2) आत्मस्थलावर अशा हल्ल्याचे समर्थन करणे, कलम 352 शांततेचे उल्लंघन व कलम 324 (4) अनैतिक कृत्यामुळे आर्थिक नुकसान करणे तसेच कलम 351(3) गंभीर दुखापत किंवा मृत्युची धमकी देऊन गुन्हेगारी करणे ज्यामध्ये 7 वर्षाच्या शिक्षेची तरतुद आहे ह्या सर्व कलमांचा समावेश करण्यात आले आहे. सगळ्या कलमांमध्ये मजिस्ट्रेट ट्रायेबल असल्याने आरोपी आकाश आव्हाड, निलेश अहिरे व आणि जयेश मोते यांना अटक व जामिनावर सुटका करण्यात आल्याचे समजते.

आज ज्याप्रकारे भारताची अवस्थता झाली आहे जेथे धर्माच्या नावाने राजकारणी हे राजकारण करतात आणि समाजात द्वेष निर्माण होण्यासारखे भडकाऊ भाषण देत विष कालवण्याचा प्रयत्न करतात हे विविध ठिकाणी दिसुन येत आहे. पुर्वी हे महाराष्ट्र वगळता इतर राज्यात दिसत होते परंतु आता दंगलीसारख्या घडना महाराष्ट्रातही घडत असल्याने कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अशी म्हणण्याची वेळ आहे. आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री एका कार्यक्रमात ठोकुन काढा असल्या शब्दांचा वापर करतात तर सिंधुदुर्गचे ज्येष्ठ भाजप नेते नारायण राणे यांचे सुपुत्र मीच हिंदुंचा गब्बर म्हणत तरुणांमध्ये इतर धर्मांप्रती द्वेष निर्माण होण्यासारखे भाषण देत असल्याने महाराष्ट्राचे पुढचे भवितव्य काय याबाबत जनतेला चिंता वाटु लागली आहे.

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...