लाडकी बहिण योजना पुन्हा वादाच्या भोवर्यात
नवी मुंबई (बदलापुर विकास मिडिया)- महाराष्ट्र राज्यात ज्याप्रकारे महिलांवर अत्याचार होत आहे आणि पोलिस प्रशासनाकडून कारभार दिसुन येत असतांना लाडकी बहिण योजना आधिच वादाच्या भोवर्यात असतांना आता नवी मुंबई येथील एक प्रकार समोर आल्याने लाडकी बहिण योजनेतही घोटाळा झाल्याचे दिसुन येते.
नवी मुंबई येथील एक महिला यांनी जेव्हा महाराष्ट्र राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजनेअंतर्गत हक्काची दीड हजार रुपये मिळण्यासाठी प्रयत्न असता अनेकदा तो अर्ज दाखल होत नव्हता त्यामुळे काहींनी याबाबत तक्रार भाजपचे माजी नगरसेवक यांच्याकडे केली. याबाबत अधिक चौकशी केल्यानंतर समजले कि सदर महिलेच्या नावाने आधिच सातारा येथील जाधव नामक व्यक्तिच्या बायकोच्या नावावर पैसे पोहोच झाल्याचे समजते. विशेष म्हणजे जाधवच्या मोबाईल नंबर अर्जदार महिलेच्या अर्जावर दाखल असल्याचे दिसुन आले. याप्रकारे सातार्यातील जाधव या व्यक्तिने तब्बल 30 अर्ज दाखल करत महाराष्ट्र शासनाची आर्थिक फसवणुक केली आहे. या घटनेनंतर आता सातार्याच्या जाधव प्रमाणे संपुर्ण महाराष्ट्रात अजुन किती लोकांनी अश्या प्रकारे सामान्य जनतेच्या कर रुपी येणार्या पैश्यांवर डल्ला मारला आहे यावरच नागरिकांना लक्ष वेधलेले आहे.
पुर्वीच असुरक्षित आणि शहरातील गुन्हेगारीमुळे लाडकी बहिण सुरक्षित नाही आधि सुरक्षा द्या म्हणत योजनेविषयी चर्चा असतांना आता लाडकी बहिण योजनेत झालेल्या घोटाळ्यामुळे संपुर्ण योजनाच वादाच्या भोवर्यात आल्याचे समजते.



