केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या वक्तव्यानंतर आंतरराष्ट्रीय संघटनेतील भारतीय पत्रकारांनेे दिले प्रतिउत्तर
गोवा (बदलापुर विकास मिडिया)- गोवा राज्यातील पणजी येथे भाजपाच्या पक्ष कार्यालयात भाजप सदस्य नोंदणी कार्यक्रम सुरु होते. या कार्यक्रमात उत्तर गोव्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईख, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे व इतर भाजप ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी भाजपचे गोव्यात पाच लाख सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष असल्याने सदस्यता नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमात खासदार नाईक यांनी एक अजब वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘पत्रकारांनी देखील भाजपचे सदस्यत्व घेऊन पक्षात प्रवेश करावा. रिपोर्टींग हा व्यवसाय आहे, त्यामुळे ते पक्षात प्रवेश करु शकतात’ या वक्तव्यानंतर राज्यातच नव्हे तर संपुर्ण भारत देशात व आतरराष्ट्रीय पातळीवर विविध पडसाद उमटतांना दिसुन येते.
अमेरिकेतील फ्लोरिडा येथील एशियम जर्नलिस्ट सेफ्टी फॉरमचे सदस्य पत्रकार कामत यांनी बदलापुर विकासशी बोलतांना सांगितले कि, हो आता भारतात पत्रकारांनीच भाजपचे सदस्य होणे बाकी आहे, पत्रकारांनीच जर पक्षप्रवेश केला तर भारतात विविध राज्यात घडणार्या घोटाळे, भ्रष्टाचार आणि बलात्काराच्या घटनांबाबत बातम्याच जनतेसमोर येणार नाही. बलात्काराच्या विविध घटना ज्यामध्ये भाजपच्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांचा कुठे ना कुठे लिंक असतो हे सदस्य झालेले पत्रकार मग प्रकाशित करतांना विचार करतील. आधिच भारतातील पत्रकारांना प्रामाणिकपणे बातम्या प्रकाशित केल्यावर विविध चौकशींच्या सामोरे जावं लागतं आणि पोलिस प्रशासन अटक सुद्धा करते. त्यात आदा पत्रकारांना भाजपचे सदस्य होण्याचा जो सल्ला नाईक यांनी दिला आहे त्यामुळे भारतात राजकारण कोणत्या स्तरावर गेले आहे हे दिसुन येते.
नाईक यांच्या वक्तव्यानंतर स्थानिक पातळीवर महाराष्ट्र आणि गोव्यातील अनेक पत्रकार संघटनांनी होत असलेल्या भारतातील पत्रकारांच्या दैयनिय अवस्था आणि राजकारण याबाबत संताप व्यक्त केले आहे.