-डोंबिवलीला विद्रुप करणारे जाहिरात फलक मुद्दा
डोंबिवली (बदलापुर विकास मिडिया)- महाराष्ट्र राज्यात ज्याप्रकारे भाजपा सरकारला कंटाळुन विविध मुद्द्यांवर संपात व्यक्त करत असतांना डोंबिवली येथे एक घटना घडली आणि आता गणपत्ती बाप्पा भाजपच्या जाहिरातबाजीने हैराण झाल्याचे चित्र दिसुन आले.
गणेशोत्सवानिमित्त एक गणेश भक्त जेव्हा आपल्या बाप्पांना वाहनातुन नेत असतांना रस्त्यावर असलेल्या भाजपा पक्षाचे नेते रविंद्र चव्हाण यांचे ‘डोंबिवलीचा मानबिंदू दहीहंडी उत्सव’ जाहिरात फलक अडथळा निर्माण करत असल्याचे दिसुन आले. विशेष म्हणजे जेव्हा दहिहंडा उत्सव संपले तरी देखील हे फलक उतरवण्यात का आले नाही असा प्रश्न देखील आता सुरु झाला आहे. याबाबत कल्याण – डोंबिवली सामाजिक समस्या आणि भ्रष्टाचार विरोधी निर्भय बनोो फेसबुक पेजवर हे छायाचित्र प्रकाशित केल्याने जाहिरात फलक शहरात कशाप्रकारे विद्रुपीकरण आणि अडथळा निर्माण करते याची चर्चा होत आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत जाहिरात फलक मुळे होणारी शहराची विद्रुपीकरण हे विषय काय नवीन नाही परंतु आता ज्याप्रकारचे चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे राजकिय नेते आणि प्रशासन मंडळी जनतेच्या शांततेचा अजुन किती अंत पाहणार अशी म्हणायची वेळ आली आहे.
छायाचित्रातुन स्पष्टपणे दिसत आहे कि, सार्वजनिक गणेशोत्सवासाठी जेव्हा गणेशभक्तांनी आपल्या बाप्पांना नेत असतांना सदर भाजपा पुरस्कृत जाहिरात फलक अडथळा निर्माण करत आहे. यामुळे आता जनतेनंतर बाप्पांनाही भाजपा हैराण करत असल्याची गणेश भक्तांमध्ये चर्चा आहे.