आरोपींना पकडण्याची औकात नसलेल्या भ्रष्ट महाराष्ट्र पोलिस खातं आता पत्रकारांना चौकशीसाठी देत आहेत समज

Date:

-बदलापुर शहरातील महिला पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांना भिवंडी गुन्हा शाखेकडून समज

– चौकशीसाठी 2 सप्टेंबर रोजी उपस्थित राहण्याचे दिले आदेश

– पोलिस प्रशासनाकडून पुन्हा एकदा बदलापुरातील पत्रकारांवर दबावतंत्र वापरण्याची प्रक्रिया सुरु

-पत्रकारांना पोलिसांमार्फत टार्गेट करण्यामागचा खरा सुत्रधार कोण?

बदलापूर (महेश कामत)- आंदोलन आणि जनआक्रोश हे आता थोडं शांत होतांना दिसुन येत असुन महाराष्ट्र पोलिस खात्यातील लाचार पोलिस अधिकारी आता बदलापुरातील पत्रकारांना एक एक करुन टार्गेट करण्याचं काम करत आहे. विशेष म्हणजे आंदोलनाचे वार्तांकन करणार्या महिला पत्रकारालाच आता भिवंडी गुन्हा शाखेकडून चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समज दिल्याने महाराष्ट्र पोलिस खातं कोणत्या थराला जाऊन लाचारी करतेय हे दिसुन येत आहे.

बदलापुर जेथे विविध गंभिर स्वरुपाचे गुन्हे घडतात आणि पोलिस प्रशासन त्या गुन्ह्यांना नियंत्रण करण्यात वेळोवेळी अपयशी ठरते त्या बदलापुर पुर्व पोलिस ठाण्यातील एका अधिकार्याच्या फिर्यादीवरुन बदलापुरच्या स्थानिक पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांना विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आल्याचे सांगत 2 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समज भिवंडी गुन्हे शाखेकडून देण्यात आले.

ज्या बदलापुर शहरात पोलिस प्रशासन बलात्कारी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी अनेक दिवसांचा कालावधी लावते, शाळा प्रशासनावर कारवाई होऊ नये म्हणुन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करते त्यातच दुसर्या घटनेती एका महिला पत्रकाराचा शाब्दिक विनय भंग होऊन सुद्धा पिडीतेची तक्रार घेण्यास टाळाटाळ करते आणि शेवटी आरोपी विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर सुद्धा आरोपीला अटक करत नाही अश्या अकार्यक्षम आणि लाचार पोलिस खातं आता पत्रकारांवरच पुन्हा एकदा दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्टपणे दिसुन येते. सदर महिला पत्रकार श्रद्धा ठोंबरे ह्या शहरातील विविध विषयांवर आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी या उद्देशाने विविध जनहिताच्या बातम्या प्रकाशित करतात. तसेच ठोंबरे व अश्या अनेक जागृक पत्रकारांनी आजवर केलेल्या बातम्यांमुळे बदलापुर शहरात कशाप्रकारे भ्रष्टाचार होतो आणि राजकिय खेळी होते हे सामान्य जनतेला समजत असल्याने अश्या पत्रकारांनी नुकताच झालेल्या आंदोलन आणि जनआक्रोशाच्या दिवशी सुद्धा पत्रकारितेचे आपले कार्य केले परंतु तसे असतांनाही त्यांच्या विरोधात एका पोलिस वाल्याच्या फिर्यादीने गुन्हा दाखल केल्याच्या प्रकरणाने महाराष्ट्र पोलिस खातं कशाप्रकारे लोकशाहीचा चौथ्या स्तंभाची विटंबना करत आहे हे दिसुन येते. याबाबत बदलापुर शहरातील लोकपालकचे प्रदिप रोकडे व इतर पत्रकारांनी एकजुटता दाखवली असुन ठोंबरे यांना जर एकाही लाचार पोलिसवाल्याने पोलिसी दम देण्याचा प्रयत्न केल्यास भिवंडी आर्थिक गुन्हे शाखेत घडणार्या आजवरच्या अनेक विषयांची मालिकाच सुरु होणार असे थेट बदलापुर विकास मिडियाचे सर्वेसर्वा महेश कामत यांनी म्हटले आहे.

पत्रकार कामत पुढे म्हणतात कि, खरं तर ज्या पोलिस वाल्याने पत्रकाराविरोधात फिर्याद दिली आहे त्याविरोधात पॉवर ऑफ अब्युस चा गुन्हा दाखल करण्यासाठी बदलापुर विकास मिडियाच्या वतीने महाराष्ट्र मानवअधिकार संघटनेकडे लेखी तक्रार देण्यात आले असुन जर पत्रकारांचे नाव या गुन्ह्यातुन हटवण्यात आले नाही तर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका देखील दाखल करणार. बदलापुरात पुर्वी ज्याप्रकारे पत्रकारांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा पोलिस प्रशासनाने घाट घातला ते आता होऊनच देणार नाही असेही कामत शेवटी म्हणाले.

याबाबत मुंबई येथील महाराष्ट्र पत्रकार हल्ले विरोधी संघटना ठाणे पोलिस आयुक्त यांना बदलापुरच्या होत असलेल्या पोलिसांचा भोंगळ कारभार बाबत लेखी तक्रार अर्ज देणार असल्याचे समजते.

गोपनिय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नुकताच ज्याप्रकारे कुळगांव बदलापुर नगरपरिषदेच्या भ्रष्टाचाराबाबत अनेक बातम्या बदलापुरच्या स्थानिक पत्रकारांनी बातम्या प्रकाशित केल्यामुळे भ्रष्टाचारी गब्बरने पोलिसांना पत्रकारांना टार्गेट करण्यासाठी सुपारी दिल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...

किसन कथोरे यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातुन भाजपकडून उमेदवारी अधिकृत्तरित्या जाहिर

बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- भारतात आणि विशेष करुन महाराष्ट्रात...