– ठाणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुरक्षेची मागणी?
ठाणे (बदलापुर विकास मिडिया)- जेव्हा महिलांंवरील अत्याचार आणि विनयभंगाच्या घटनेला राजकारणाचे नाव दिले जाते अश्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री यांच्या उपक्रमाप्रमाणे लाडकी बहिणींना सुरक्षा कधी मिळेल? असा प्रश्न आता सामान्य जनतेला विचारलायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्हा ज्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गड मानलं जातं त्याठिकाणी मागील 7 महिन्यात तब्बल 233 अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्हा शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील 5 पोलीस उपायुक्त कार्यालयांतर्गत 35 पोलीस ठाणे आहेत. या विविध पोलीस ठाण्यांत गेल्या 7 महिन्यांत 233 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घडना घडून पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक कल्याण पोली परिमंडळ 3 हद्दीतील पोक्सोचे 61 गुन्हे दाखल आहेत. तर त्या सह उल्हासनगर पोलीस परिमंडळ 4 मध्ये 55, भिवंडी परिमंडळ 2 मध्ये 48, तर ठाणे शहरातील 1 आणि 5 या दोन्ही परिमंडळामध्ये 43 गुन्हे दाखल असल्याचे समोर येत आहे.
या सगळ्या घटनेमुळे ठाणे जिल्ह्यातील महिला वर्ग नको आम्हाला त्या ढीर हजार रुपयांची भीक असे सरकारकडे म्हणत मुलींना आणि महिलांंना सुरक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.
या सगळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री फडणवीस आता तरी राजिनामा देणार का? यावरच सर्वांचे लक्ष वेधलेले आहे.