– पोलिसांच्या अश्या वागणुकीमुळे सामान्य जनतेत पोलिसांविषयी आक्रोश
मुंबई खार येथील घटना
मुंबई (बदलापुर विकास मिडिया)- नुकताच एक धक्कादायब बाब समोर आले आहे जेथे नार्कोटिग ड्रग्स सारख्या गंभिर गुन्ह्यात एका निष्पाप रहिवाश्यांला कट रचुन अकडवण्याचा प्रयत्न खार येथील चार पोलिस अधिकार्यांनी केले. या घटनेची परिमंडळ 9 चे पोलिस उपायुक्त राजतिलक रौशन यांंनी चौकशी करत दोषी पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली परंतु आता सामान्य नागरिकांमध्ये महाराष्ट्र पोलिस खात्याकडून कशाप्रकारे खोटे गुन्ह्यात सामान्य रहिवाश्यांना अडकवण्यात येत असल्याची विविध शहरात चर्चा होत आहे.
दि. 30 ऑगस्ट रोजी खार परिसरात गोठ्यात काम करणार्या एका व्यक्तिला अमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरुन बळजबरीने खार येथील पोलिसांनी अटक करत पोलिस ठाण्यात नेले व झडती घेतांना एका पोलिसवाल्याने अमलीपदार्थाचे पाकिट फिर्यादीच्या खिश्यात टाकले. सदर व्यक्तिच्या खिशातुन 20 ग्रॅम मेफेड्रोन सापडल्याचा दावा पोलिसांनी केला, परंतु हे सगळे करत असतांना संपुर्ण घटना पोलिस ठाण्यातील सी.सी.टी.व्ही कॅमर्यामध्ये कैद झाली आणि इतर पोलिसांनी जेव्हा फुटेज तपासले तेव्हा अटक व्यक्तिला तातडीने सोडण्यात आले. फिर्यादीने याबाबत रितसर तक्रार केल्यानंतर वरिष्ठांनी तपास करुन दोषी अधिकार्यांना निलंबन केले.
या निलंबनाच्या कारवाईनंतर आता खार येथील मानवाधिकारी आणि सामाजिक संघटनेकडुन पोलिसांवर जोरदार टिका होत असुन तातडीने चारही आरोपींवर गुन्हा दाखल करत शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.
याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या एका ज्येष्ठ वकिलाने आपले नाव न छापण्याच्या अटीवर बदलापुर विकास मिडियाशी बोलतांना सांगितले कि, जेव्हा एक सरकारी पोलिस कर्मचारी अश्या प्रकारे खोटे गुन्हे ते देखील अमलीपदार्थ विषयात करतात अश्यांवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. खोटे पुरावे तैयार करणे कलम 192 आणि 193, निर्दोष व्यक्तीला गुन्ह्यात अडकवणे या बाबत कलम 211, सार्वजनिक सेवकाची चुकीची वर्तवणुक याबाबत कलम 166, शासकीय अधिकाराचा गैरवापर आणि दुरुपयोग याबाबत कलम 220, मुलभुत हक्कांचे उल्लंघन भारतीय संविधानाचे कलम 21, नारकोटिक डॅग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायदा 1985 अंतगर्त कलम 58 आणि 59, तसेच एकापेक्षा जास्त (चार) पोलिसांनी संगनमताने केल्याने फौजदारी कट कलम 120 बी नुसार दाखल करुन आरोपी पोलिसांवर कारवाई होणे गरजेचे आहे. फक्त निलंबन करुन काहीही होणार नाही आणि दोष मिटणार नाही.
