तातडीने महामानवाचे किंवा कलाकारांचे नाव देण्याची बदलापूरकरांची मागणी
बदलापूर (महेश कामत)- कुळगांव बदलापूर नगरपरिषद हद्दीत रहिवाश्यांच्या कररुपी पैश्यातुन कोट्यावधी रुपये खर्च करुन विविध ठिकाणी गार्डन आणि सभागृह उभारण्याचे काम मागील अनेक वर्षांपासुन करण्यात येत असतांना अनेक कामात तर भ्रष्टाचार तर होतोच आणि कंत्राटदार गब्बर होतात त्याचसह अश्या विकास कामांना गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या राजकिय नेत्यांचे नाव दिल्याने ते आता बदललचे पाहिजे अशी सामान्य बदलापूकरकरांची मागणी आहे.
बदलापूर शहरात विविध ठिकाणी गुन्हेगारी पाश्वभुमी असलेल्या राजकिय नेत्यांच्या आडनाव आणि नाव देऊन गार्डन आणि इतर विकास कामांचे उद्घाटन आजवर करण्यात आले. सुशिक्षित आणि सुसंस्कृत रहिवाश्यांच्या परिसरात जो गार्डन उभारला जातो त्या गार्डनचे नाव एका विनयभंग आरोपीचे नावही असल्यामुळे यामुळे शहराचे नाव बदनाम होत आहे. त्यामुळे आता हे बदलले माहिजे म्हणुन आंबेडकरी समाजाचे तसेच मराठा समाजाचे विविध बदलापूर शहर परिसरातील नेते मंडळी मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी करत आहेत.
माननिय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्षाने पवित्र झालेल्या बदलापूर शहरातील अनेक विकास कामांना त्यांचे नाव तसेच त्याचप्रमाणे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव, झाशीची राणी व अश्या अनेक महामानवाचे व कलाकारांचे नाव देण्यात यावा जेणेकरुन महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृती पुढच्या पिढीला पाहायला मिळेल. तसे न करता एका गुंड प्रवृत्तीच्या राजकारण्याचे नाव अश्या विकास कामांना दिल्यास त्या शहरातील वातावरण देखील गुंडशाही होते हे विसरता कामा नये.
सदर विषय हा अत्यंत महत्वाचा असुन जर तातडीने कुळगांव बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी दखल घेतली नाही तर शहरातील अनेक सामाजिक संंघटना मुंबई हाईकोर्टात पी.आय.एन. दाखल करणार असल्याचेही समजते.