-पोलिस तक्रार घेण्यास टाळाटाळ
डोंबिवली (बदलापूर विकास मिडिया)- महाराष्ट्रातील तडजोडीच्या सरकारामुळे राज्यातील जनता असुरक्षित आहे. नुकताच कोळसेवाडी पोलिस ठाणे हद्दीत बौद्ध समाजाच्या एका अल्पवयीन मुलाला शुल्लक कारणावरुन मारहाण करण्यात आले. विशेष म्हणजे पिडीत अल्पवयीन मुलाचे वडिल देखील पोलिस असतांना कोळसेवाडी पोलिस ठाण्याने मात्र लाचारासारखे तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने महाराष्ट्र पोलिस खातं आपली जबाबदारी प्रामाणिकपणे कधी पार पाडणार असा प्रश्न बदलापूर विकास मिडियाने केला आहे.
दुचाकी वाहन पार्क करण्याच्या शुल्लक कारणावरुन बौद्ध समाजाच्या अल्पवयीन पिडीतेस गुन्हेगार प्रवृत्तीच्या गुंडांनी बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे अल्पवयीन मुलावर अश्याप्रकारची घटना घडल्यानंतर जेव्हा पिडीतेची आई त्याला पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी नेले असता पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केले. त्यामुळे आज दि. 29 ऑगस्ट रोजी बौद्ध समाजाचे अनेक कार्यकर्ते आणि दयावान सरकार संस्थापक अध्यक्ष संदिप निकुंभ यांनी कोळशेवाडी पोलिस ठाण्यात दाखल होऊन एफ.आय.आर. दाखल करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे बौद्ध समाजाचे इतके सर्वजण पिडीतेला न्याय मिळावा म्हणुन पोलिस ठाण्यात आले असतांनाच देखील फक्त लेखी अर्ज स्विकारत अतिशय निर्लज्जपणाने तेथील पोलिस कर्मचार्यांनी आता शिपाई पोस्टमार्टरच्या विषयासाठी व्यस्त असल्याचे सांगत नंतर तक्रार नोंदवु असे सांगितल्याने महाराष्ट्र पोलिस प्रशासनातील अश्या पोलिसवाल्यांना नियमांनुसार आणि प्रोटोकॉल नुसार काम करण्याची का सवय नाही असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत. यामुळे सदर पोलिस अधिकार्यावर देखील कारवाई होणे गरजेचे असल्याने बदलापूर विकास मिडियाने सदर पोलिसाची तक्रार संबंधीत विभागात केली असुन तातडीने पिडीतेची तक्रार दाखल करुन आरोपीला अटक करा अशी मागणी जोर धरत आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार पिडीत अल्पवयीन ह्याचे वडिल देखील पोलिसात असुन मुख्यमंत्री संभाजी शिंदे यांच्या राज्यात सामान्य जनता आणि महिला वर्गच नाही तर पोलिसवाल्यांची मुलं देखील सुरक्षित नसल्याचे दिसुन येते.



