भाजप सरकारच्या काळात महिलांचे अब्रु वेशीला
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री फडणवीस महिलांच्या संरक्षणात अपयशी! –
रत्नागिरी (रमेश परब)- कोलकत्ता मधील डॉक्टरच्या बलात्कार व हत्याकांड मुळे संपुर्ण देशात हळहळ व्यक्त होत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यात एका नर्सिंग विद्यार्थीनीवर रिक्षावाल्याने बलात्कार केल्याची घटना समोर येत आहे. 20 वर्षाच्या या नर्सिग विद्याथीनीवर सध्या उपचार सुरु आहे.
पिडीत विद्यार्थीनी कॉलेज मधुन घरात येण्यासाठी ऑटोरिक्षा घेतांना ही घटना घडल्याचा प्राथमिक तपासात पोलिसांना समजते. विद्यार्थीनीला रिक्षावाल्याने पिण्यासाठी पाणी दिले होते त्यामध्ये गुंगीचे औषध असल्याचे माहिती समोर येत आहे.
पोलिस सी.सी.टी.व्ही. फुटेजद्वारे आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र एवढं होऊन सुद्धा अद्याप राजिनामा न दिल्याने राजिनामाचा ड्रामा जनतेची दिशाभुल करण्यासाठी होते का असा सावल सामान्य नागरिक विचारत आहेत.
कोलकत्यात आर. जी. मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात एका 31 वर्षीय महिला डॉक्टर रुग्णालयातील सेमिनार हॉलमध्ये विश्रांतीसाठी गेली असता तिच्यावर संजय रॉय या नराधमाने बलात्कार करुन तिची हत्या केली. त्यामुळे संपुर्ण देशात हळहळ व्यक्त होऊन देशव्यापी डॉक्टरांचे आंदोलन व संप पुकारण्यात आला. 11 दिवसांपर्यंत हे आंदोलन सुरु असतांना शेवटी सुप्रिम कोर्टाने 23 ऑगस्ट रोजी सदर घटनेची दखल घेतल्यानंतर आंदोलन संपले.
कोलकत्यातील घटनेनंतर महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील बलात्काराच्या घटना समोर आल्याने भाजपच्या सरकार काळात महिलांचे अब्रु वेशीला अशी म्हणायची वेळ आता आली आहे.