मी मनात आणेन तेव्हा तसं करु शकतो – नारायण राणे यांचे जनतेला भयभीत करणारे विधान

Date:

पत्रकाराशी माफी मागण्याची मालवण पत्रकारांची मागणी

मालवण (बदलापूर विकास मिडिया)- नुकताच महाराजांचा पुतळा जोरदार वार्याच्या झोक्याने कोसळल्यानंतर सत्ताधार्यांच्या भ्रष्ट कारभाराबाबत संपुर्ण महाराष्ट्रात चर्चा होत असतांना घटनास्थळी पाहणी करण्यासाठी त्याठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे गेले असता त्याठिकाणी वातावरण अत्यंत दहशतीचे होते. थेट पोलिसांच्या अंगावर धाऊन येणे तसेच पत्रकाराचा माइक हिस्कावण्याचा सारखा प्रकार सत्ताधारीचे नाराय़ण राणे यांच्याकडून करण्यात आला. तसेच घरात घुसुन एकेकांच्या मारुन टाकेन असेही धमकावणारे विधान राणे यांनी दिल्याने संपुर्ण राज्यातील सत्ताधारी यांची दहशतीची पातळी कोणत्या थरावर पोहोचली आहे अशी चर्चा आहे.

त्यातच आज एका मिडियाशी प्रतिक्रिया देतांना नारायण राणे यांनी मी मनात आणेन तेव्हा तसं करु शकतो असे म्हटल्याने कायदा आणि सुव्यवस्था शिंदे सरकारच्या महाराष्ट्र राज्यात आहे की नाही असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

सध्या ज्याप्रकारे राजकिय नेते शासनाची कोणतीच भिती राहिलेली नाही हे वेळोवेळी दाखवत सरळ ठार मारण्याच्या धमक्या देत सुटल्याने महाराष्ट्र्राचा सामान्य नागरिक कसं काय सुरक्षित आहे? हे एवढं होऊन सुद्धा पोलिस प्रशासन मात्र योग्य त्या प्रकारे कारवाई करत नसल्याने भारतातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आहे.

ज्येष्ठ नेते राणे यांनी ज्याप्रकारे आंदोलनात वार्तांकन करणार्या पत्रकाराचा माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला ते चौथ्या स्तंभाला काळीमा फासणारा प्रकार असुन पत्रकारांची माफी मागा अशी मागणी आता मालवण शहरातील पत्रकारांनी केल्याचे समजते.

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...