21 कमिटी सदस्य व 50 गोपनिय सदस्य नेमण्यासाठी इच्छुकांना संपर्क करण्याचे आवाहन
बदलापूर विकास मिडियाचे उपक्रम
बदलापूर – कुळगांव बदलापूर शहरात मागील अनेक वर्षांपासुन विविध प्रकारच्या घोटाळ्यांची मालिका सामान्य जनतेला बघायला मिळाली, कधी प्रशासकीय इमारतीचा घोटाळा तर कधी टी.डी.आर. घोटाळा, सीमेंट कॉन्क्रीटच्या कामात घोटाळा तर बी.एस.यु.पी. च्या योजनेत ही घोटाळा, तेवढेच नाही तर महामानवाच्या पुतळा उभारण्यातही घोटाळा अश्या अनेक घोटाळ्यांमध्ये सामान्य जनतेचे कररुपी कोट्यावधी रुपयांचे नुकसात झाले. बदलापूर शहर बदलता बदलता भ्रष्ट राजकारण्यांनी आपलेच जिवलशैली बदलण्यास सुरुवात केली आणि पैश्यांच्या जोरावर कोणी स्वतःहा शहराचा बाप म्हणु लागला तर कोणी नगररचनाकाराच्या सहाय्याने आर.टी.आय. कार्यकर्त्यावर गोळ्या झाडु लागला. राजकिय नेतेच नव्हे तर प्रशासकिय अधिकारी देखील या सगळ्या चोरट्यांना ‘आम्ही सगळे भाऊ मिळुन वाटुन खाऊ’ असे म्हणत पालिकेत लोकप्रतिनिधीच्या तालावर नाचु लागले. त्यात शहरातील पोलिस प्रशासन ही जनतेसाठी प्रामाणिक नसल्याने अश्यावेळी ह्या सगळ्यांना वठणीवर आणण्यासाठी वेगळी सिस्टीम वापरावी लागेल म्हणुन आता पारदर्शक बदलापूर (transparentbadlapur.in) मोहिम सुरु करण्याची संकल्पना बदलापूर विकास मिडियाने शहरातील नागरिकांसमोर मांडली आहे.
कुळगांव बदलापूर नगरपरिषदेत जो काही ठराव होतो, जे काही टेंडर काढले जाते, जे काही कामे होणार आहे त्याबद्दल कंत्राटदार नेमण्यात येते, किती किमतीच्या विकास कामांचे धनादेश कॉन्ट्रक्टरला देण्यात येतो याची ए टू झेड माहिती या वेबसाईटवर प्रकाशित करणार असुन यामुळेे बदलापूरात चाललय तरी काय हे मतदारांच्या लक्षात येईल व शहर सुधारण्यास गती मिळेल.
ऑक्टोबर 2024 पासुन कार्यरत होणारी ही वेबसाईट ही फक्त एकट्या बदलापूर विकास मिडियाच्या पाठपुराव्याने शक्य होणार नाही तर त्यासाठी बदलापूरातील जागृक नागरिकांच्या मदतीचा हातभार आवश्यक आहे. त्यामुळे बदलापूर विकास मिडिया शहरातील प्रत्येक मतदारांना आवाहन करते कि, पारदर्शक बदलापूर या वेबसाईटच्या कमेटी मध्ये 21 लोकांची नेमणुक करणे असुन ज्या व्यक्तींना बदलापूर शहर सुधरावे अशी मनापासुन वाटते व त्याचवेळी राजकिय दबाव सहन करण्याची क्षमता आहे अश्या समाजसेवक आणि समाजसेविकांनी सदस्य होण्यासाठी संपर्क करावे. त्याचसोबत ज्या बदलापूर शहरातील नागरिकांची शहर सुधरावे आणि भ्रष्टाचारावर आळा बसावा अशी इच्छा तर आहे परंतु घर, परिवार, नोकरी आणि जबाबदारीमुळे प्रत्यक्षात समोर येऊन कमिटीला सहकार्य करु शकत नाही त्यांनी 50 गोपनिय सदस्याच्या पॅनलमध्ये आपले टोपण नाव नमुद करत मोहिमेत सहभावी व्हावे, जेणेकरुन सामान्य जनतेचा आवाज बदलापूर विकास पारदर्शक बदलापूर मोहिमेतून योग्य ठिकाणी पोहचवणार.
सदस्य होण्यासाठी आणि बदलापूर शहराला सुरक्षित व विकसित करण्यासाठी आपल्याकडे नविन कल्पना असल्यास सुचवण्यासाठी आजच badlapurvikas@gmail.com वर विषय – ‘पादर्शक बदलापूर’ उल्लेख करुन इमेल पाठवा.
सदर पारदर्शक बदलापूर मोहिमेचा संपुर्ण खर्च बदलापूर विकास मिडिया करणार असुन या विषयाला जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी पोस्ट शेअर करा…