गावगुंड वामन बारकु म्हात्रेचा अटकपुर्व जामिन रद्द करण्यासाठी समाजसेवकांचा कल्याण सत्र न्यायालयात हस्तक्षेप अर्ज

Date:

मा. बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेच्या भल्यासाठी कोर्टात न्याय मागण्याची घटनेत दिली आहे तरतुद – समाजसेवक ईर्शाद शेख 

– बदलापूर अट्रोसिटी प्रकरण –

कल्याण (किशोर जगताप)- अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना ताजी असतांनाच शिंदे गटातील गावगुंड लोकप्रतिनिधी वामन बारकु म्हात्रे यांनी एका महिला पत्रकाराला अश्लिल शब्द बोलुन पोलिसांची धमकी दिल्याने त्यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. महिला पत्रकार या एस.सी. समाजातून असल्याने बदलापूरातील मागास्वर्गीयांमध्ये तसेच संपुर्ण शहरातील नागरिकांमध्ये आक्रोश पसरले आहे.

वामन म्हात्रे याने पोलिसांनी अटक करु नये म्हणुन कल्याण सत्र न्यायालयात अटकपुर्व जामिन अर्ज केला असुन सदर अटकपुर्व जामिन रद्द करण्यात यावी म्हणुन कल्याण तालुक्याचे समाजसेवक ईर्शाद शेख यांनी कल्याण सत्र न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल करत असल्याचे मिडियाशी बोलतांना सांगितले.

ईर्शाद शेख यांनी मिडियाशी बोलतांना सांगितले कि, ‘वामन बारकु म्हात्रे ह्या व्यक्तिविरोधात मी नसुन गुन्हेगारी विरोधात आम्ही आहोत. बदलापूर शहरात या आरोपीने याआधी सुद्धा एका ज्येष्ठ पत्रकाराला दोन वेळेस आपल्या सहकार्यांमार्फत अपहरण केले होते तसेच दहशत पसरविण्यासाठी दुसर्या एका पत्रकाराची प्रेस वाहन जाळुन शहरात दंगे करण्याचे प्रयत्न केले. हे असले गुन्हे अत्यंत गंभिर स्वरुपाचे असुन देखील बदलापूर पश्चिम पोलिसांनी आरोपींवर योग्य ती कारवाई केलीच नाही. या पुर्वी देखील प्रशासकिय इमारतीचा घोटाळा बाहेर काढणार्या आणखी एका पत्रकाराला म्हात्रे या आरोपीने स्वतःच्या बांधकाम व्यवसायाच्या गाळ्यात दोन दिवस डांबुन ठेवले होते. त्यामुळे सदर आरोपीचे गुन्हेगारी पाश्वभुमी बघता अश्या गुन्हेगाराची अटकपुर्व जामिन मंजुर होऊ नये म्हणुन आम्ही सामाजिक संघटनेच्या वतीने कल्याण सत्र न्यायालयात आज दि. 28 ऑगस्ट 2024 रोजी हस्तक्षेप अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक बाब म्हणजे मी जेव्हा हे अर्ज कोर्टातील त्या महिला अधिकारीला दाखल करण्यासाठी दिले असता त्यांंनी संपुर्ण अर्ज वाचल्यानंतर फेकुन दिले व अर्ज दाखल करण्यास टाळाटाळ केली. अनेकदा विनंती केल्यानंतर वकिलाशिवाय दाखल करता येत नाही असे त्या म्हणाल्या. त्याप्रमाणे मी त्याचवेळी एका वकिलाना हस्तक्षेप अर्ज देत त्यांनी ही जेव्हा दाखल करण्यासाठी मॅडमकडे गेले असता तेव्हा सुद्धा सदर महिला अधिकारी यांनी दाखल करणार नाही’.

ईर्शाद शेख पुढे म्हणतात कि, ‘बदलापूर शहरात ज्या प्रकारचे गुन्हे वारंवार वामन बारकु म्हात्रे कडून करण्यात येते ते काही फक्त पालिकेत भ्रष्टाचार किंवा छोटे मोठे गुन्हे नसुन पत्रकारांचा अपहरण, गाळी जाळणे, मारहाण करणे, दहशत पसरविणे असल्या गुन्हे त्यांच्यावर आहे. लोकांचा प्रतिनिधी म्हणुन शहरात वावरत असतांना जर असले गुन्हे हे लोकप्रतिनिधी करत असतील तर सामान्य नागरिक किती सुरक्षित आहे? त्यामुळे पब्लिक इंटरस्ट हा महत्वाचा आहे आणि त्यामुळेच माझ्या हस्तक्षेप अर्ज दाखल करण्याचा उद्देश योग्य आणि आणि बाबासाहेबांच्या घटनेने तो अधिकार मला दिला आहे.’

ईर्शाद शेख यांंनी हस्तक्षेप अर्जाची कॉपी आमच्या प्रतिनिधीला दाखवत हेही सांगितले कि, नुकताच घडलेली घटना जेथे बदलापूर पोलिस प्रशासन तक्रार नोंदवण्यास दिरंगाई करते आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा आरोपीला पकडत नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. धक्कादायक म्हणजे फरार असतांना सुद्धा आरोपी म्हात्रे यांनी विविध माध्यमांना ज्याप्रकारे प्रतिक्रिया दिली आहे त्यात देखील थेट दबल मिनिंग द्वारे म्हात्रेंनी पिडीत महिला पत्रकाराला घाबरवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. ज्यामुळे भविष्यात अटकपुर्ण जामिन मिळाल्यानंतर सुद्धा पिडीतेच्या आणि तिच्या परिवाराच्या जीवाला शोधा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘आज जी लोकं तिच्या (पिडीत महिला पत्रकार) सोबत तक्रार करतांना आहे ते 15 दिवसांनी तिच्यासोबत नसणार, सगळे गायब होतील तेव्हा फक्त वामन म्हात्रे तिचा भाऊच तिच्यासाठी उभा राहणार’ असले वाक्य टी.व्ही.9 माध्यमाशी प्रतिक्रिया देतांना म्हात्रे म्हणतात याचा काय अर्ध लावावा. या वाक्यावरुन थेट समजुन येते कि आरोपी म्हात्रे सदर पिडीतेला धमकाविण्याचा प्रयत्न करतोय. तसेच दुसर्या बाईटमध्ये म्हात्रे म्हणतात ‘तीने आई वडिलांची शप्पथ घेऊन सांगायवं वामन म्हात्रे ने केलं म्हणुन…’ असे बोलुन पिडीतेना शप्पथ घेतल्यानंतर सुद्दा अनेक मिडियासमोर पुन्हा पुन्हा तेच बोलुन आरोपी म्हात्रे पिडीतेच्या आई वडिलांवर धोका निर्माण होईल यासाठी तसे बोलत होते का?

लोकस स्टँडीचा प्रश्न – आरोपी हा एक लोकप्रतिनिधी असतांना अत्यंत गंभीर स्वरुपाचे गुन्हे अनेकदा पत्रकारांसोबत करत असल्याने भारताचा चौथा स्तंभ धोक्यात असुन पत्रकारालाच न्याय मिळणार नाही तर सामान्य जनतेचं काय होणार या भितीत सामान्य भारतीय नागरिक जगत असल्याच्या समाज हिताच्या कारणावरुन हस्तक्षेप अर्ज मेरिट दाखवत दाखल करता येतो असे कल्याणच्या अनुभवी वकिलाने माहिती दिली.

बदलापूर विकास प्रतिनिधीने हस्तक्षेप अर्ज पाहिल्यावर समजुन येते कि मेरिटनुसार समाजसेवक शेख यांनी जनतेच्या भल्यासाठी हे अर्ज कल्याण सत्र न्यायालयात दाखल करण्याचा प्रयत्न केले असतांना कोर्टातील त्या महिला अधिकार्याने अर्ज घेण्यास नकार का दिला याचा शोध आता मिडिया घेत आहे.

एकुणच आरोपी वामन म्हात्रे यांंनी मागील अनेक वर्ष ज्याप्रकारे गुंडगिरी व दहशत पसरविण्याचे काम केले ते आता जनतेसमोर उघडकीस येत असुन म्हात्रेचा पापाचा घडला भरलाय अशी शहरात चर्चा आहे.

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...