महाराष्ट्रातील पिडीतेची किम्मत 10 लाख रुपये ?

Date:

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सरकार 10 लाख रुपये आणि शिक्षणासाठी पिडीतेला देणार असल्याची घोषणा

बदलापूर (महेश कामत)- नुकताच महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी बदलापूर बलात्कार घटनेबाबत आपली प्रतिक्रिया देतांना मिडियाशी सांगितले कि, सदर पिडीतेला 10 लाख रुपयांची मदत महाराष्ट्र शासन करणार तसेच पदवीपर्यंत शिक्षणाचा खर्च सरकार करणार.

सदर 10 लाखाची मदतीची घोषणा ऐकल्यानंतर महाराष्ट्रात हे असे घडतच राहणार की काय असा प्रश्न आता सामान्यांना पडला आहे. 

बदलापूर शहरात ज्याप्रकारी घटना घडली ती काय पहिल्यांचा घडलेली नाही, पुर्वी सुद्धा अश्या प्रकारची गुन्हेगारी पाहायला मिळाली आहे. भाजपचे आमदार किसन कथोरे व कुळगांव बदलापूर नगरपरिषदेचे तत्कालिन नगररचना सुदर्शन तोडणकर विरोधात जेव्हा आर.टी.आय. कार्यकर्ते कै. अरुण सावंत यांनी तक्रार व आंदोलन केले होते त्यावेळी सावंतवर अज्ञात इसमांनी गोळीबार केला. आरोपींचा काही शोध लागला नाही आणि घटनेत सामिल असल्याच्या कारणावरुन ज्या राजकिय नेते कथोरे आणि सरकारी कर्मचारी तोडणकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले होते त्यांंची सुटका झाली. गोळे लागल्यानंतर आर.टी.आय कार्यकर्ता कै. सावंत ह्यांच्या मणक्याला इजा होऊन ते आयुष्यभरासाठी पैरेलीसीने त्रासुन गेले होते. अनेक वर्ष बेडवरच त्यांचा प्रवास होता. त्यावेळेस सुद्धा परिस्थिती सुधरावी म्हणुन सरकारने काहीएक कठोर पाऊन उचलले नाही शेवटी महाराष्ट्र मानवअधिकाराने घटनेची दखल घेत पोलिसांविरोधात कारावाईचा अहवाल प्रस्तुत करत पिडीत कै. अरुण सावंत यांना 10 लाख रुपयांची मदत शासनाने करावी असे जाहिर केले. कै. सावंत यांना ते 10 लाख रुपये शासनाकडून मिळाले की नाही हा तर वेगळाच विषय. परंतु ह्या सगळ्याप्रकारामुळे महाराष्ट्रातील जनतेची किम्मत 10 लाख असेल तर पालिकेत आणि मंत्रालयात भ्रष्टाचारातुन पैसा कमविलेल्या गुंड प्रवृत्तीच्या राजकारण्यांना 10 लाख रुपये ही किम्मत किती मोठी असणार हे आता सामान्य जनतेने विचार करायला हवे.

परदेशात राहणार्या एका भारतीयाने बदलापूर विकासशी बोलतांना सांगितले कि, 10 लाख एका मुलीची अब्रु किंवा आर.टी.आय. कार्यकर्त्यांचा जीव पुन्हा आणुन देऊ शकणार का? 10 लाख परदेशात दोन महिन्याचा सामान्यांचा पगार असतो तरी महाराष्ट्र सरकार ज्याप्रकारे 10 लाखाच्या बाता करुन प्रकरण शांत होण्याचा विचारत करत असेल तर अश्या वेळेस महाराष्ट्रातील सामान्य जनतेचे अश्या सरकारला धडा शिकवायला हवा असे मत व्यक्त केले.

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...