यापुर्वीची बदलापूरकर कोविडच्या महामारीत असतांना 600 कोटींचा भ्रष्टाचारात म्हात्रे होते व्यस्त
बदलापूर (महेश कामत)- कुळगांव बदलापूर शहरात नुकताच घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर ज्याप्रकारे स्थानिक भ्रष्ट लोकप्रतिनिधींचे दलालगिरीचे आणि चमचेगिरीचे कृत्य पाहिल्यावर बदलापूर शहरात आता कोविड काळातून 600 कोटीच्या भ्रष्टाचाराची देखील जोरदार चर्चेला सुरुवात होत आहे. शहरातील चर्चाप्रमाणे तेव्हाही अश्याच राजकारण्यांनी घटनेचे गांभिर्य समजुन न घेता फक्त भ्रष्टाचार आणि पैसा ह्यातच आपले योगदान दिल्याचे दिसुन येते.
मार्च 2020 ज्या कोविळ काळात 600 कोटींचा भ्रष्टाचार कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पुजारी याने केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे त्या भ्रष्टाचारातच बदलापूरचा बाप म्हणुन मिरवणार्या वामन बारकु म्हात्रे याच्या सावाचा सर्वप्रथम उल्लेख होत असल्याने प्रत्येक भ्रष्टाचारात म्हात्रेचं नाव येतं करी कसं? असा प्रश्न आता सामान्य जनतेला पडला आहे.
कोविड काळ जेव्हा संपुर्ण दुनियेतील रहिवाशी जगणार की मरणार याच भितीत जगह होती अश्या वेळी वडवलीच्या त्या ठेकेदार कम लोकप्रतिनिधीला अश्यातचही पैसा कमविण्याचे रोग काय थांबायला मागत नव्हते. एप्रिल 2020 मध्ये पालिकेची मुदत संपल्यानंतर राज्य सरकारने उल्हासनगरचे तत्कालिन उपविभागीय अधिकारी दीपक पुजारी यांना ऑक्टोबर 2020 पासून कुळगांव बदलापूर नगरपरिषदेवर प्रशासकपदी नेमले गेले. त्यानंतर पुढील तीन वर्षात प्रशासक आणि मुख्याधिकारीच नगरपरिषदेचा कारभार बघत होते.
त्या काळात मार्च मध्ये नगरपालिकेत 200 कोटी शिल्लक असतांना 2020-21 मध्ये त्यात 300 कोटींची भर पडली. 2021-22 मध्ये 317 कोटी तर 2022-23 मध्ये 300 कोटींची भर पडली. अशा प्रकारे गेल्या तीन वर्षांत नगरपालिकेत 1100 कोटी रुपये जमा झाले. या तीन वर्षांच्या कालावधीतील आवश्यक खर्च आणि प्रशासकीय खर्च याची रक्कम वजा केली तर तीन वर्षांत सुमारे 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची कामे केल्याचा आणि त्यासाठी खर्च केल्याचा दावा प्रशासक करत आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यातील अनेक कामेच झाली नसल्याचे उघडकीस आले होते.
त्यावेळी ह्या नागरिकांच्या करातील शिल्लक पैश्यांतून सन 2021-22 आणि 2022-23 या दोन वर्षांत प्रशासकांनी प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या दीड हजारापेक्षा जास्त प्रशासकीय ठरावांना मंजुरी दिली. ही कामे केल्याचा खोटा अहवाल जिल्हा लेखा परीक्षक यांना सादर केला. लेखा परीक्षकांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पडताळणी करण्याचा अधिकार नसल्याने नगरपालिकेने सादर केलेली कागदपत्रे ग्राह्य धरूनच त्यांनी लेखा परीक्षण केले. या झालेल्या आणि न झालेल्या कामांची सक्षम तांत्रिक प्राधिकाऱ्यांकडून चौकशी केल्यास यात शेकडो कोटींचा खोटाळा बाहेर येईल, असा त्याकाळी दावाही लोकप्रतिनिधी संभाजी शिंदे यांनी केल्याचे समजते.
महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1956 मध्ये प्रशासकीय नगराध्यक्षांच्या अधिकाराबाबत कुठलेही अधिकार नमूद केले नसल्याने नगराध्यक्षांच्या अधिकाराचा फायदा प्रशासक असलेल्या दीपक पुजारी यांनी घेतला. मार्च 2020 मध्ये कोविड काळात स्थानिक प्रशासनाला विशेष नियम लागू करण्याचे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर जनतेसाठी खर्च करण्याचे अधिकार राज्य सरकारने दिले होते.
नगरपालिकेत प्रशासक असताना कुठल्याही कामाला मंजुरी घेताना त्याआधी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र बदलापूर नगरपालिकेच्या प्रशासकांनी जिल्हाधिकाऱ्यांना कुठलीही कल्पना न देता स्वतःच्या अधिकारात हे सगळे ठराव मंजूर केले आहेत त्यामुळे पुजारीला ‘’भविष्यात चौकशी होणार नाही’’ म्हणुन मुख्यमंत्री शिंदे गटातील लोकप्रतिनिधी वामन म्हात्रेने विश्वासात घेतल्याचे सुत्रांकडून बोलले जाते.
मुळात पालिकेने नियमांची पायमल्ली करत ज्याप्रकारे ठेके मंजुर केले त्यातील बहुतेक ठेके हे लोकप्रतिनिधी वामन बारकु म्हात्रेच्या निकटवर्तीयांना देण्यात आल्याचे स्पष्टपणे पुराव्यात दिसत आहे. अनेक ठेकेदार हे अपात्र असतांना सुद्धा त्यांना बोगस पात्रता प्रमाणपत्रे मिळवुन देण्यात आले. दोन कोव्हिड सेंटरही म्हात्रे पुरस्कृत ठेकेदारांना बहाल करण्यात आले त्यामुळे कोविड काळातही समाजकारणाचे आव आणुन वामन बारकु म्हात्रेने भ्रष्टाचारातून किती पैैसा कमिवला याबाबत आता बदलापूरातील ज्ञानी मंडळी संशोधन करत आहेत.
ह्या सगळ्यातून एकमात्र स्पष्टपणे दिसत आहे कि, बदलापूर शहराला अश्या लाचखोर आणि भ्रष्ट बापाची आजिबात गरज नाही. जो बदलापूरकर दिवस रात्र मेहनत करुन रक्त आणि घाम एकत्र करुन मेहनत करुन कु.ब.न.प. मध्ये कररुपी पैसे भरतो आणि त्यानंतरही योग्य सुविधा त्यांंना मिळत नाही त्याच बदलापूरात म्हात्रे सारखे भ्रष्ट नेते कोविड असो किंवा बलात्कार घटना प्रत्येकात आपला फायदा कसा होईल यासाठी हिरहिरीने पुढाकार घेत असल्याने कुठे नेऊन ठेवलाय बदलापूर माझा अशी बोलायची वेळ आता आली आहे.



