– बदलापूर विकास मिडियाची मागणी
बदलापूर (महेश कामत)- कुळगांव बदलापूर नगरपरिषद जेथे नागरिकांच्या कराच्या पैश्यावर डल्ला मारतांना सत्ताधारी राजकारणी व सरकारी अधिकारी कोणीही लाज बाळगत नाही आणि कायद्याची ज्याला भीती नाही अश्या अनेक महाभागांनी कोविड काळात अंदाजे 600 कोटी रुपयांचे भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपा लोकप्रतिनिधी संभाजी शिंदे यांनी सन 2023 साली लावला होता. सदर घोटाळ्याचे पुढे काय झाले याची कोणाला कल्पना नाही आणि शहरात भ्रष्टाचाराचा सिलसिला सुरुच असल्याने नागरिकांना देखील या विषयाचा ट्रैक करुन ठेवता आले नाही.
नुकताच बदलापूर विकास मिडियाने शहरातील बातम्या करण्यास व अन्यायाविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केल्यानंतर आता पुर्वीचे अनेक घबाड बाहेर येत आहे. पुराव्यानिशी मिळालेल्या माहितीनुसार कोविड काळात ज्याप्रकारे मुख्याधिकारी पुजारी यांनी एका विशिष्ट लोकप्रतिनिधीच्या जवळीकांना ठेक्यांची खैरात कोविळ लसाप्रमाणे वाटत सुटल्याने बदलापूरातील कर दात्यांच्या पैश्यातुन अंदाजे 600 कोटींचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या सर्व भ्रष्टाचार करण्याचा जो मोडस अपरेंडी आहे ते काय रॉकेट सायन्स नाही त्यामुळे योग्य रितीने शासनाने तपास करण्यास सुरुवात केल्यास चकित करणारे अहवाल बाहेर येईल असे मत बदलापूर विकास मिडियाने व्यक्त केले आहे.
ज्या मुख्याधिकारी पुजारी यांनी 10 लाखाहुन जास्त किमतीच्या ठेके देण्याची नगरपरिषदेच्या नियमाप्रमाणे परवानगीच नाही अश्यात मोठमोठे कामांचे दहा तुकडे करत त्याच त्याच कामांचे असे शेकडो वेगवेगळ्या नावाने बोगस कामांची यादी करत टेंडर करण्यात आल्याचे मिळालेल्या पुराव्यांवरुन दिसुन येते. तसेच अपात्र असलेल्या ठेकेदारांना पात्रताचा सर्टिफिकेट जणु कोविड नेगेटिव्हचा प्रमाणपत्र दिल्यासारखे वाटत सुटल्याने मुख्याधिकारी पुजारी देखील अडचणीत येणर यात वाद नाही.
दि. 27 ऑगस्ट 2024 रोजी बदलापूर विकास मिडियाच्या वतीने ठाणे आर्थिक गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंदार लाड यांना लेखी स्वरुपात कोविड टेंडर घोटाळ्याची तक्रार करण्यात आली असुन तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच टी.डी.आर. घोटाळ्याच ज्याप्रकारे आर्थिक गुन्हे शाखा दिरंगाई करत आहे असे कोविड टेंडर घोटाळ्यात करु नये असे आवाहनही तक्रारीद्वारे आर्थिक गुन्हा शाखेला देण्यात आल्याचे समजते.



