बदलापूर (महेश कामत)- नुकताच ज्याप्रकारे बदलापूरच्या गावगुंड व महिलेचे शाब्दिक विनयभंग करणार्या वामन बारकु म्हात्रे ने केलेल्या गुन्ह्याविषयी वामन सेनेचे अंधभक्त कार्यर्कते ज्याप्रकारे आमचा दादा तसा नाहीच असे बदलापूरच्या मतदारांना पटवुन देण्यासाचा जो पुरेपुर प्रयत्न करत आहे हे पाहुन खरोखरच आपल्या बदलापूर शहरात सत्य, धर्म, आत्मसन्मान आणि माणुसकी ह्या गोष्टी शिल्लक राहिली नाही का कि ते देखील कंत्राटदार पद्धतीने विकण्यात आले आहे असा सुज्ञांचा प्रश्न पडला आहे.
एके ठिकाणी सगळ सगळ बदलापूरच्या जनतेला खुद्द वामन म्हात्रेच्या कारनाम्याने सर्वकाळी डोळ्यासमोर दिसत आहे कि, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर जनता नाराज होऊ नये म्हणुन म्हात्रेने पुरेपुर प्रयत्न करत थेट एका महिला पत्रकाराची सुद्धा अब्रु नुकसान करण्याचे काम केले. त्यातल्या त्यात विविध मिडियासमोर खुद्द वामन म्हात्रे याने ज्याप्रकारे प्रतिक्रिया दिली त्यावरुन स्पष्ट दिसत आहे कि, सरकार विरोधात प्रकाशित केलेल्या बातम्यांचा राग मनास धरुन वामन म्हात्रे याने अनेक शब्द महिला पत्रकाराला सांगितेल त्यामुळे शाब्दीक विनयभंग व पत्रकारावर दहशत पसरविण्याचा म्हात्रेचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येत आहे.
सदर घटनेतील सी.सी.टी.व्ही. फुटेज सुद्धा थेट हेच सिद्ध करते कि, वामन म्हात्रे याने केलेल्या कृत्यामुळे महिला पत्रकाराने हात दाखवत बोलण्यास सुरुवात केली. म्हणजेच वाद निर्माण होईन असले वाक्य म्हात्रेच्या तोंडून निघाल्यानंतर हे सर्व काही झाले हे दिसत असतांना बेरोजगार अंधभक्त कार्य़कर्ते अजुनही दादांची पालखी उचलण्यात व्यस्त असलेले पाहुन बदलापूर शहरात बेरोजगारी आणि आत्मसन्मान काहींमध्ये किती खालच्या पातळीपर्यंत पोहोचली आहे हे स्पष्ट पणे दिसत आहे.
एक म्हात्रे समर्थक म्हणतो, आमचा दादा बदलापूरचा बाप आहे, दुसरा कार्यकर्ता म्हणतो म्हात्रे ने आजवर 20 हजार हुन जास्त महिलांना सहलिला पाठविले, तिसरा कार्य़कर्ता म्हणतो दादांशिवाय दुसरं कोण महोत्सव राबवणार या शहरात हे असल्या प्रकारे जे कार्यकर्ते बदलापूरच्या जनतेची आता समजुन काढण्याचा जो काही प्रयत्न सुरु आहे यावरुन असल्या कार्यकर्तेंची किवी वाटु लागली आहे. कंत्राट ठेके, पैसा, लाचारी यामध्ये गुंग झालेले बदलापूरचे वामन सेनेचे कार्यकर्ते दादाला खरं ठरवण्यासाठी आपला धर्म, आत्मसन्मान आणि माणुसकी कोणत्या थराला नेहून ठेवतील हे पाहुन आश्चर्य होत आहे.
एक महिला जिच्यावर भर रस्त्यावर अनेक लोकांच्या समोर गावगुंड लोकप्रतिनिधी अब्रुला नुकसान होईल असले शब्द उच्चारतो, पिडीत महिलेला पोलिसात ही दोन दिवस दाद मिळत नाही दुखद बाब म्हणजे हे सर्व त्या शहरात घडतय ज्या शहराला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्ष लाभले आहे. अब्रु नुकसान झाल्यानंतर सुद्धा पिडीतेला न्याय मिळु नये कारण आरोपी हा पैश्याने श्रीमंत आहे असले विचार करणारे बदलापूरचे महाभागच म्हणावे लागेल.
सध्याच्या वामन सेनेच्या कार्यकर्त्यांचा खटाटोप पाहुन भविष्यात बदलापूर शहरात महिला नक्कीच कुठेच सुरक्षित नसणार मग त्याठिकाणी सी.सी.टी.व्ही. असो किंवा नसो, कारण सी.सी.टी.व्ही. असुन सुद्धा आम्हाला आरोपीचे
संभाषण ऐकुच आलं नाही असे सांगणारे लाचार नग आपल्या शहराला लाभलेले आहे.
वामन म्हात्रे यांच्या राजकिय कारकीर्दापुर्वी कधी कोणी इतर राजकारण्याने बदलापूर शहराला मी या शहराचा ”बाप” आहे असे म्हटले नव्हते परंतु याच बदलापूरच्या पालिकेला लुटून भ्रष्टाचारातून कमविलेला पैसा आणि त्या पैश्यातुन ज्यांना माज आलाय त्यांना आपणच सगळ्यांचे ”बाप” असा गोड गैरसमज झालेले दिसुन येत आहे.