धन्य तो भारताचा कायदा आणि न्याय व्यवस्था !
बदलापूर (महेश कामत)- कुळगांव बदलापूर शहरात ज्याप्रकारे दोन अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली व त्यामुळे संपुर्ण देशात बदलापूराच्या घडनेची घोर निंदा झाली त्यानंतर सुद्धा आरोपीच हाच अक्षय शिंदे आहे का व ह्यानेच बलात्कार केला का यासाठी आता पिडीत मुलीसमोर या बलात्कार्याची ओळख परेड होणार असल्याची चर्चा आहे.
नुकताच ठाणे पोलिस आयुक्त यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ओळख परेड होण्याच्या विषयाची चर्चा आता सुरु आहे. कल्याण सेशन कोर्टातुन आरोपीला पोलिसांनी नेण्यात आले असुन ओळख परेडची खरंतर गरज आहे का असा प्रश्न आता महाराष्ट्रातील तमाम नागरिकांमार्फत विचारण्यात येत आहे.
4 वर्षीय चुमुकलीवर बलात्कार होतो, पोलिस प्रशासन अनेक दिवस कारवाई करत नाही, पिडीतेची आई ढिम्म पोलिस प्रशासनाच्या कारभारामुळे त्रास सहन करते हे सर्वांंनंंतर आता पिडीत मुलीला पुन्हा एकदा ओळख परेडच्या नावाने त्या नराधमाला बघावे लागणार हे सर्व पाहुन भारताचा कायदा आणि सुव्यवस्था भारतीय नागरिकांची आणि महिलांची सुरक्षा करण्याच्या दृष्टीने योग्य आहे का असा प्रश्न आता परदेशातील मानवअधिकार संघटना विचारायला सुरुवत करत आहेत.
फिर्यादीचा जबाब, शाळेतील साक्ष, मेडिकल रिपोर्ट या सगळ्यांनंतर सुद्धा ओळख परेड हे गरजेचे आहे का? ओळख परेड हे कोणत्या आणि कश्याप्रकारे वापरला गेला पाहिजे यावर आता न्यायपालिकेने विचार करणे गरजेचे आहे.
ओळख परेड हे त्यावेळी करण्यात येते जेव्हा पोलिसांनी पकडलेला आरोपी हा 100 टक्के तोच आरोपी आहे ककि नाही हे पिडीताच्या साक्षीने ओळख होती परंतु सदर घटनेत बलात्कारी शिंदे यास अटक झाल्यापासुनच सोशल मिडियावर आणि सर्वत्र ठिकाणी नराधमाचा फोटो हा आधिच प्रकाशित झाल्यानंतर ओळख परेडची खरंतर गरजच नाही असे तज्ञ वकिलांची म्हणणे आहे.
त्यामुळे आता बलात्कारी शिंदे यासोबतच आपल्या कायद्यात ही पिडीतेना न्याय मिळावा म्हणुन योग्य ती दुरुष्टी होणे गरजेचे असल्याची राज्यात चर्चा आहे.सदर ओळख परेडचे नाटक पाहिल्यावर जे भारतीय नागरिक अमेरिका आणि युरोप मध्ये राहतात त्यांनी बदलापूर विकासशी बोलतांंना सांगितले कि, आमच्या येथे जेव्हा अश्या घटना घडतात तेव्हा ओळख परेड सारखा ड्रा होत नाही, पल्बिक प्रोसेकुटर थेट पुराव्यांच्या आधारे आणि पिडीतेच्या फिर्यादी आणि साक्षिदारांच्या जबाबावरुन निर्णय़ घेतला नाही. विशेष म्हणजे परदेशात पोलिस प्रशासन हे प्रामाणिकपणे काम करत असल्याने पुरावे किंवा आरोपी कधी बदलत नाही. परंतु भारतात भ्रष्ट पोलिस खात्याच्या चुकार कामामुळे ओळख परेड व इतर गोष्टींचा बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्यात समावेश केला जात असेल.