मग शिव्या खाण्यासारखे काम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लाचार पोलिस करतात कशाला? -जनतेचा प्रश्न

Date:

लाचार पोलिस अधिकारी सुभदा शितोळे – शिंदे यांची निलंबनानंतर बदलीचे आदेश ; मुंबईत होणार कार्यरत?

बदलापूर (महेश कामत)- महाराष्ट्रात महिला सुरक्षित नसतांना व वारंवार अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेत वाढत अश्यावेळी सत्ताधारी चमकोगिरीच्या दृष्टीने नाशिक येथे कार्यक्रमात व्यस्त असल्याचे दिसुन येते. तितकच नव्हे तर त्या कार्यक्रमात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस प्रशासनाने सतारात्मक बदल घडवला असून

कायदा आणि सुव्यवस्था आहे, हे पोलिसांनी दाखवून दिले असल्याचे वक्तव्य करीत त्यांच्या कामगिरीच्ये कौतुक करीत पाठ थोपटली आहे.

फडणवीस पुढे म्हणतात कि, गेल्या काही दिवसांपासुन कुठलीही घटना घडल्यानंतर गृहमंत्री आणि पोलिसांना शिव्याच खाव्या लागतात. थँक्स लेस हा जॉब आहे, त्यांना अवार्ड मिळत नाही असे वक्तव्य केले आहे.

या वक्ताव्यानंतर महाराष्ट्रातील संतप्त नागरिक व पिडीत मगिला वर्ग आता विचारणा करत आहे कि, अल्पवयीन मुलींवर दररोज होणार्या बलात्काराचा अवार्ड भाजपच्या गृहमंत्री आणि पोलिस प्रशासनाला दिला पाहिजे का? आमच्या मुली शहरात आणि शाळेत कुठेच सुरक्षि नाही यासाठी म्हणुन पोलिसांना थैक्स म्हणायचे का? अश्या प्रश्नांना सुरुवाात केली आहे.

बदलापूरच्या अनेक संतप्त नागरिकांना थेट फडणवीस आणि भ्रष्ट पोलिस प्रशासनावर टिका करत म्हटले आहे कि, बदलापूरच्या त्या लाचार वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला निलंबन करुन दोन दिवसांनी बदलीचे आदेश काढलेल्या प्रशासनाना आम्ही अवार्ड द्यावे का? एवढी कशी ही निर्लज्ज सरकार…? अश्या तिखट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

नुतकाच झालेल्या महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आणि विशेषतः बदलापूरात ज्याप्रकारे दुर्दैवी घटना झाल्यानंतर सत्ताधार्यांची खरे चेहरा जनतेसमोर आले आहे यामुळे बदलापूरच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रातील मतदार आता सत्ताधार्यांवर चांगलेच संताप व्यक्त करत आहेत.

एकेठिकाणी मुख्यमंत्री शिंदे घटनेचे गांभिर्य समजुन घेत नाही व अश्या गंभीर घटनेतही राजकारण करण्यात व्यस्त असतांना भारतीय जनता पक्षाचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री फडणवीस सुद्धा सदर घटनेची योग्य रित्या दखल घेण्याऐवजी लाचार पोलिसांना अवार्ड देण्याच्या बाता करत असल्याने राज्यात चाललय तरी काय?

बदलापूरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यानंतर तब्बल 48 तास तत्कालिन वरिष्ठ पोलिस निरीक्षाका श्रीमती. सुभदा शितोळे ह्या पिडीतेची तक्रार घेण्याऐवजी प्रकरण दाबण्याचा पुरेपुर प्रयत्न करत असल्याचे आता एस.आय.टी. अहवालातुन सिद्ध झाले असता अश्या वरिष्ठ पोलिस निरीक्षिकाला 20 तारखेला निलंबदनाचे आदेश देऊन दोन दिवसांनंतर म्हणजे 22 तारखेला बदलीचे आदेश देण्यात आल्याचे समजते. सदर बदली ही मुंबई पोलिसात झाल्याचे समजते. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला व पिडीतेच्या परिवाराला मुर्ख समजतले आहे कि काय असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

नुकताच देवेंद्र फडणवीस हे नाशिकच्या कार्यक्रमात ज्याप्रकारे पोलिसांची बाजु घेत वक्तव्य करत होते त्यांच्या अश्या वागण्याने तमाम महाराष्ट्रातील मतदारांच्या भावनेची भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना काडीमात्रही आदर नाही हे स्पष्टपणे दिसुन येते. जेव्हा राज्याचा गृहमंत्रीच लाचार पोलिस प्रशासनाच्या बाजुने बोलण्यास मागे पुढे पाहत नसेल आणि अवार्डची अपेक्षा करत असणार तर अश्या लाचार पुलिसांना वचक तरी कोणाचा राहील? दिवसेंदिवस महाराष्ट्र पोलिस खात्यातील अनेक पोलिस अधिकार्यांची लाचारी आणि निक्रिय कारकीर्दामुळे आजवर लाकोच्या संख्येने जनताच त्रास सहन करत आहेत व पिडीतेच्या कक्षेत न्यायाची अपेक्षा करत आहे, अश्यावेळी भ्रष्ट पोलिस प्रशासनाला दुरुस्त करण्यासाठी योग्य ते पाऊन उचलणे ते सोडून जेव्हा गृहमंत्रीच लाचार पोलिस खात्याची बाजु घेत असेल तर महाराष्ट्र राज्याचा आणि कायदा सुव्यवस्थेचा पुढे काय होणार याची चिंता महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना होत आहे.

ज्याप्रकारे लाचार पोलिस अधिकारी श्रीमती. शितोळे यांची उचलबांगडी नंतर बदलीचे आदेश सोशलमिडियावर प्रसारित होत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता सत्ताधार्यांचा हा कारवाईचे नाटक आता कळुन चुकले आहे.

महाराष्ट्रातील फक्त बदलापूर शहरातच नव्हे तर इतर अनेक शहरात सत्ताधार्यांच्या कारकीर्दीत अल्पवयीन मुलींवरील बलात्कार, महिलांचे विनयभंग आणि गुन्हेगारीच्या घटनेत भयंकर वाढ होत असले तरी सत्ताधारी मात्र ज्याप्रकारे विषयांना बगल देण्याचा जो काही प्रयत्न करत आहेत त्यामुळे मतदार राजा पुर्वीप्रमाणे पुढेही झालेलं सगळं विसरणार की काय?

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...