महाराष्ट्र पोलिसांच्या CCTNS वेबसाईटवरुन आरोपी वामन म्हात्रेची एफ.आय.आर. गायब!

0
48

महाराष्ट्र पोलिस खात्याची लाचारी कधी संपणार?

बदलापूर (महेश कामत)- बदलापूरचे पोलिस खाते किती खालच्या पातळीपर्यंत लाचारी हे पुन्हा एकदा दिसुन येत आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या CCTNS वेबसाईटवरुन आरोपी वामन बारकु म्हात्रे याची एफ.आय.आर. गायब झाल्याने नुकताच बदलापूर विकास मिडियाच्या निदर्शनास आले आहे. सदर स्क्रिनशॉट बदलापूर विकास मिडिया प्रकाशित करत असुन वेबसाईटवरून नेमकं हेच एक एफआयआर गायब असल्याने एवढी कसली राजकारण्यापुढे पोलिस खात्याची लाचारी असा प्रश्न आता सामान्य जनता विचारत आहे.

शिवसेना शिंदे गटातील लोकप्रतिनिधी व गुंड प्रवृत्तीचे आरोपी वामन म्हात्रे ज्याने नुकताच बदलापूरात एका महिला पत्रकाराला पोलिसांच्या नावाने दम देत अश्लिल वाक्याचा उच्चार करुन महिलेचे अब्रु नुकसान केल्याने अट्रोसिटीचा गुन्हा म्हात्रेविरोधात दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात म्हात्रे याची जामिनावर सुटका झाली असुन सदर घटनेची एफ.आय.आर. महाराष्ट्र पोलिस खात्याच्या CCTNS वेबसाईटवर दिसतच नसल्याने पोलिस प्रशासन अजुन किती खालच्या पातळीवरुन जाऊन सत्ताधार्यांचे तळवे चाटणार असा प्रश्न आता जागृक नागरिकांना पडला आहे.

नियमाप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याने गुन्हा घडल्यानंतर जेव्हा एफ.आय.आर. नोंद होते ते महाराष्ट्र सरकारच्या सीटीझन महारा पोलिस च्या एफ.आय.आर. सेक्शन मध्ये प्रकाशित करते. सदर प्रकाशित केलेल्या स्क्रिनशॉट मध्ये एफ.आय.आर. क्र. 386 गायब असल्याने हेच एफ.आय.आर. तर नाहीना असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे जे आंदोलन झाले आणि त्यात पोलिसांनी अनेकांवर गुन्हा दाखल केला ते एफ.आय.आर. आणि इतर घटनेची एफ.आय.आर. मात्र वेबसाईटवर सुरळीत रित्या प्रकाशित केल्याचे दिसुन येते फक्त आरोपी म्हात्रे च्या घटनेची एफ.आय.आर. नसल्याने महाराष्ट्र पोलिस खाता न्युट्रल पद्धतीने कार्यरत नसल्याचे दिसुन येते.

जर पोलिसच गुंड प्रवृत्तीच्या राजकिय आरोपींना पाठीशी घालण्यासाठी सडेतोड प्रयत्न प्रत्येक ठिकाणी करत असणार तर सामान्य महिलांनी आपली अब्रु वाचवायचं तरी कसं असा प्रश्न पत्रकार महेश कामत यांनी विचारले आहे.

याबाबत आता स्थानिक बदलापूरकरांनी ठाणे पोलिस आयुत्य यांना तातडीने तक्रार करणार असल्याचे सुत्रांकडून समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here