बदलापूर (महेश कामत)- बदलापूर शहरात ज्याप्रकारे या काही दिवसात विविध घटना घडल्या आणि संपुर्ण देशात बदलापूर शहराच्या नावाची बदनामी झाली अगदी बदनामी सह हेही संपुर्ण देशाला कळले कि या शहरातील काही विशेष व्यक्तिंची मानसिक किती खालच्या पातळीची आहे म्हणुन. अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो आणि त्या घटनेचे वार्तांकन करणार्या महिला पत्रकार मोहिनी जाधव यांस पोलिसांची धमकी देत ‘’जणु का तुझाच बलात्कार झालाय बातमी करायला’’ आणि ’’बलात्कार झालाय की विनयभंग?’’ असं बोलणार्या शिंदे गटातील लोकप्रतिनिधी वामन बारकु म्हात्रे याच्या अश्या वागण्यामुळे संपुर्ण बदलापूर शहरात आणि देशभरात घोर निंंदा होत आहे. म्हात्रेच्या या अश्या पराक्रमामुळे या लोकप्रतिनिधीची मानसिकता आता जनतेसमोर दिसुन येते.
ज्या सुसंस्कृत लोकांचे शहर म्हणुन बदलापूर शहराची प्रतिमा होती त्या शहरात मागील काही वर्षात गुंड प्रवृत्ती आणि भ्रष्टाचार या दोन्ही समस्यांमुळे शहराचे नाव खराब होण्यास सुरुवात झाले. सदरही बलात्काराची घटना फक्त एक निमित्त परंतु बदलापूर शहरात या अश्या घटना अनेकदा घडल्या आणि पिडीतांना कधी न्याय मिळालेच नाही. त्यात कहर कहर म्हणजे आता लोकप्रतिनिधींना आजिबात नागरिकांच्या विचारांची आणि मतांनी भिती राहिलेली नाही म्हणुन जे कृत्य म्हात्रे याने केले ते हेच सिद्ध करते की शहरातील नागरिकांनी विशेष म्हणजे मतदारांचा काडीमात्र आदर राहिलेला नाही. जेथे बदलापूरातील जनता आज सुरक्षित नाही आणि पोलिस प्रशासन मुकदर्शक म्हणुन मिरवत असतांना लोकप्रतिनिधी सुद्धा अश्या घटना सुधाराव्या म्हणुन पुढाकार घेण्याऐवजी उलट कार्य करत असल्याने असल्या लोकप्रतिनिधींचे आता करायचे तरी काय असा प्रश्न बदलापूरातील संतप्त नागरिक विचारत आहेत.
ज्या बदलापूर शहरात नागरिकांनी आजवर लोकप्रतिनिधींना मतदान केले त्या नागरिकांच्या खराब रस्त्याची समस्या असो किंवा इतर समस्या लोकप्रतिनिधी त्या समस्या सोडण्यास अकार्यक्षम राहिली, शहरात मतदार काय तर त्यांच्या लहान मुलींना सुद्धा आता सुरक्षितता वाटत नाही, शाळेत ही आता मुली सुरक्षित नाही आणि अश्यात वाईट आणि दुर्दैवी घटना घडल्यानंतर सुद्धा पिडीतांना न्याय मिळावा म्हणुन जेव्हा समाजसेविका आणि पत्रकारगण आपले कार्य बजावतात अश्यांना हे सत्ताचे गुंगी लोकप्रतिनिधी अश्लील वक्तव्य करतात. यामुळे बदलापूरची जनता भविष्यात मतदान करतांना किती सतर्कतेने आपले मतदान केले पाहिजे हेच सगळ्यातून स्पष्ट होते. जेव्हा एक चुकीचे उमेदवार शहराचा लोकप्रतिनिधी होतो तेव्हा त्या शहराची ही अशीच अवस्था होते जेणे ना शहर व्यवस्थित ना मतदार सुरक्षित.
सुत्रांच्या माहितीनुसार म्हात्रेच्या अश्या वागण्यामुळे आता बदलापूर शहरात अजुन एक चर्चेला उधाण आले आहे ते म्हणजे, ज्याचा भाचाच विनयभंगगाच्या आरोपी असेल त्याच्या काकाला अल्पवयीन मुलीच्या बलात्कार घटनेची पीडा काय जाणवणार? अशी चर्चा सर्वत्र होत आहे.
वाचकांच्या माहितीसाठी, लोकप्रतिनिधी म्हात्रे यांचा भाचा भावेश केशव म्हात्रे याविरोधात काही वर्षापुर्वी एका मुलीने विनयभंगाची केस दाखल केली होती. त्यावेळेस सदर आरोपी फरार होता आणि शेवटी मुंबई कोर्टाने सदर आरोपीला विनयभंगाच्या आरोपीत दोषी ठरवत शिक्षाही सुनावली. धक्कादायक बाब म्हणजे विनयभंगाच्या आरोपीला शिक्षा होती कि पुढील २ आठवडे कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या वार्ड क्र. १ च्या सार्वजनिक गार्डनमध्ये आरोपी म्हात्रे याने साफसफाई करणे.
बदलापूरच्या जनतेला माहिती असेलच की वार्ड क्र. १ हे म्हात्रेंचेच वार्ड, आरोपी ही म्हात्रेंचाच मग साफसफाई झाली की फक्त कागदोपत्री झाली हे त्यांनाच माहिती परंतु विनंयभंगाच्या अश्या सेंटीटीव्ह केसेस मध्ये जेव्हा मुंबई हाईकोर्ट देखील अश्या प्रकारची शिक्षा सुनावणार तर आरोपींना कायद्याची भिती राहणार तरी कशी असा प्रश्न जाणकार वकिलांनी केला आहे. त्यामुळेच जे आंदोलन बदलापूरात घडने ते चुकीचे आजिबात नव्हते कारण कायदा आणि सुव्यवस्थेची भिती बलात्कार्यांना राहिलीच नाही.
बलात्कारासारख्या सेंसेटीव्ह विषयात ज्याप्रकारे लोकप्रतिनिधी म्हात्रे याने आपला खरा चेहरा जनतेसमोर दाखवल्यानंतर आता बदलापूरच्या नागरिकांनी भुमिका काय राहणार यावरच सर्वांचे लक्ष वेधलेले आहे.