शाळेचे नाव आदर्श पण अनादर्श प्रशासन

0
76

ह्या समितीचा तत्काळ विसर्जन करा – बदलापूरकरांची मागणी

बदलापूर (महेश कामत)- नुकत्याच झालेल्या ४ वर्षीय २ अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी बदलापूरची जनता आता आदर्श विद्यामंदिराच्या सध्याच्या समिती तात्काळ बर्खात करण्याची मागणी होत आहे. एका ठिकाणी जेथे पोलिस प्रशासन पिडीतेच्या तक्रार दाखल करण्यात तबब्ल दोन दिवस आणि ते देखील १२ – १२ तास पिडीतेच्या पालकांना पोलिस ठाण्यात बसवुन ठेवुन शेवटी तक्रार दाखल करते त्याने पोलिस प्रशासनाची दलाली कारभार सामान्य जनतेसमोर येत असतांनाच आदर्श विद्यामंदिरावर देखील कठोर कारावईची मागणी जोर धरत आहे. आदर्श नावाची शाळा पण अनादर्श प्रशासन असी शहरभरात आता चर्चा सुरु आहे.

जाणकारांच्या मते, ज्या वेळेस आदर्श विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांना घटनेची माहिती मिळाली तातडीने कारवाई का करण्यात आले नाही. त्या नराधमासा पाठीशी घालण्याचे काम सध्याच्या समितीचे का गेले त्यामुळे आता मिडियासमोर समितीचे अध्यक्ष रडण्यासारखं करुन कंठ भरल्याचे दाखवुन ड्रामा करुन बदलापूरकरांचा सिम्पती मिळवण्याचा अयशस्वी प्रय़त्न सुरु आहे. हिच परिस्थिती जर समितीच्या अध्यक्षाच्या मुलीसोबत झालं असतं तर ४-४ दिवस वाट बघत बसले असते का हे आदर्श विद्यामंदिर कमिटीचे सदस्य आणि अध्यक्ष मंडळी पोलिस ठाण्यात न्याय मिळण्यासाठी? असा प्रश्न नागरिकांकडून होत आहे.

ज्याप्रकारे पालकांकडून दर वर्षाला एखाद्या खंडणी सारखी रक्कम फी म्हणुन आदर्श विद्यामंदिर शाळा प्रशासन फी रुपी स्विकारते त्या फीच्या पैश्याचं उपयोग योग्त रित्याने केले का सध्याच्या समितीने? कारण ज्या शाळेत महत्वाच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरा नाही, आणि जे आहेत ते कॅमेरा कार्यरत नाही, घटनेचे फुटेज गायब असल्या सगळ्या आरोपांनंतर कोणत्या तोंडाने आदर्श शाळा कमिटीचे अध्यक्ष मिडियासमोर सहकार्याची अपेक्षा करतात?

ज्या नराधमाला नियुक्ती करण्यात आली होती सध्याच्या माहितीवरुन सदर व्यक्ति हा मानसिकरित्या मंद असल्याने त्याच्यावर गोळ्यांचा उपचार सुरु होता, सदर नराधम हा यापुर्वी देखील पोलिसांच्या हिस्ट्री शेटर वर नोंद असलेला गुन्हेगार होता मग या आदर्श विद्या मंदिराच्या कमिटीला त्या वेळेस सफाई कामगाराच्या नियुक्तीच्या वेळी बैगराऊंड पडताळणी का करण्याची आवश्यकता भासली नाही? ज्या शाळेत विद्यार्थ्यांना दाखला घेतांना त्यांच्या पालकांची कसुन चौकशी केली जाते त्याच शाळा प्रशासनाला सफाई कामगाराची नियुक्ती करतांना चौकशी करणे गरजेचे आहे हे समजत नाही आदर्श शाळा प्रशासनाला?

शाळा जेथे लहान मुला-मुलींना त्यांचे पालक शाळा प्रशासनावर विश्वास ठेऊन शिक्षण घेण्यासाठी सोडतात, २-२ तास रेल्वे प्रवास आणि ८ तास नोकरी करणारे हे पालक आपल्या मेहनतीच्या पैश्याने फी भरुन, डोनेशन भरुन आपले पालकत्वाची जबाबदारी पार पाडतात त्यावेळी शाळा प्रशासनाला त्यांची विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतची जबाबदारी का कळत नाही? एका खाजगी कंपनीद्वारे सफाई कामगार नियुक्त होतो आणि शाळा प्रशासनातील शिक्षक त्या सफाई कामगाराला (पुरुष) लहान मुलींना लघवी करण्यासाठी बाथरुमला सोबत घेऊन जाण्यासाठी सांगते हे कोणते आदर्श…? एखाद्या अशिक्षित व्यक्तिने नाही तर सुशिक्षित शिक्षिका आणि शाळा प्रशासन अश्या प्रोटोकल तयार करुन बलात्कारी आणि नराधमांना प्रोत्साहन करण्यासारखे कार्य करत नाही का?

घटना घडल्यानंतर देखील जर शाळा प्रशासनाने विषयाची गांभिर्यता पाहुन पोलिस प्रशासनाला तातडीने संपर्क करुन माहिती दिली असती तर कदाचित बदलापूरच्या जनतेला थोडं तरी शाळेबद्दल सहानुभुती राहिली असती परंतु त्या ऐवजी पोलिसांनाच आपल्या कमिटीच्या पदाधिकार्यांमार्फत मोठ्या नेत्यांना माहिती देत जर पोलिस ठाण्यात दबाव तंत्राचा वापर करायचा असेल तर अश्या शाळा प्रशासनाला ज्याप्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचा व आक्रोश जनतेच्या संतापाला सामोरे जावे लागते यात आता शाळा प्रशासन काय सहकार्याची अपेक्षा करते? कारण जेव्हा सुशिक्षित शिक्षकच नपुंसकासारखे आरोपींना पाठीशी घालण्याचे काम करत असेल असल्या शाळेत भविष्यात विद्यार्थी काय आदर्श घेणार? ज्या शाळेचा मुख्याध्यापक, शिक्षिका आणि कमिटीच खोटं बोलणार, दिशाभुल करणार, बलात्कारी नराधमाला पाठिशी घालणार अश्यांना पाहुन त्या शाळेतील विद्यार्थी काय बोध घेतील?

सदर घटनेनंतर आदर्श विद्यामंदिर शाळा आणि कमिटी विरोधात प्रचंड संताप व्यक्त होत असल्याने तातडीने ही भाजप सपोर्टर कमिटी भरखास्त करा अशी मागणी जोर धरत आहे. बलात्कार नराधमचा कनेक्शन भाजप पक्षासोबत, नराधमाला नोकरीवर नियुक्त करणार्या खाजगी कंपनीचा कनेक्शन भाजप सोबत, त्या आरोपीला पाठीशी घालणार्या शाळा प्रशासनाची कमिटी भाजप समर्थक ज्यामुळे तिथे कुठे भारतात बलात्कार आणि अल्पवयीन मुलींचा विनयभंगाची बातमी येते अनेकदा त्याठिकाणी भाजप कनेक्शन लागत असल्याने या नव्या भारतात सध्या चाललय तरी काय असा प्रश्न भारतीय नागरिकांना पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here