आम्हा वकिलांवर दबाव टाकण्याचा पुरेपुर प्रयत्न पोलिस प्रशासनाने केले

Date:

– माजी नगराध्यक्ष व अडव्होकेट प्रियेश जाधव यांची पोलिसांवर टिका

भ्रष्ट पोलिस प्रशासनाची मुजोरी उल्हासनगर कोर्टात सुद्धा!

उल्हासनगर (महेश कामत)- नुकताच बदलापूर शहरात झालेल्या अल्पवयीन दोन मुलींच्या बलात्कार प्रकरणी ज्याप्रकारे स्थानिक बदलापूरांनी आपल्याच लाचारीचा नमुना पेश केला ज्यामुळे तमाम बदलापूरकरांमध्ये आक्रोश निर्माण झाले व आंदोलनाची लाठ उसळली. शेवटी जनतेच्या आक्रोशामुळे अकार्यक्षम पोलिस प्रशासनाने तब्बल साढे बारा तास

पिडीतेच्या आईला पोलिस ठाण्यात थांबविल्यानंतर तक्रार घेतली. अल्पवयीन मुलीच्या बलात्काराची घटना गांभिर्याने न घेता त्याउलट सरकार विरोधात आंदोलन सुरु असल्याने त्या आंदोलनकर्त्यांना पोलिसी खाकी दाखवण्याचा काम मात्र पोलिसांनी केले. ह्यामुळे पोलिसांनी खरी औकात बदलापूर शहरात दिसुन आले.

भ्रष्ट बदलापूर पोलिसांची मुजोरी इतेच न थांबवा उल्हासनगर कोर्टात सुद्धा पोलिसांनी पुरेपुर प्रयत्न केले प्रकरण दाबण्याचा ज्यामुळे हे महाराष्ट्र सरकारचे कर्मचारी नेमकं कोणाची लाचारी करतात असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. पोलिस अधिकार्यांनी ज्यावेळी आंदोलनकर्त्यांना उल्हासनगर कोर्टात हजर केले त्यावेळी कोणत्याही वकिलांना आंदोलनकर्त्यांची केस लढू नये म्हणुन पोलिसांनी थेट वकिलांवर दबावतंत्र टाकण्यास सुरुवात केले. पोलिसांची ही कार्यप्रणाली पाहिल्यावर सामान्य जनतेला आणि भारतीय देशातील नागरिकांना घटनेने दिलेल्या अधिकार्याप्रमाणे कोर्टात ही न्याय १०० टक्के मिळणार का असा प्रश्न निर्णाण झाला आहे.

प्रत्येक ठिकाणी जेव्हा अन्याय अतिशय वाढतं तेव्हा त्या अन्यायाचा वाचा फोडण्यासाठी कोणीतरी भलामाणुस उभा राहतोच अगदी त्याप्रमाणे कुळगांव बदलापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व अनुभवी वकिल श्री. प्रियेश जाधव यांनी पोलिसांनी धमकीला आणि दबावतंत्राला बळी न पडता थेट मिडियासमोर आपली व्यथा मांडली व अटक झालेल्या आंदोलनकर्त्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी एडीचोट करत वकिलपत्रावर अटक आरोपींचे सह्या घेतल्या. अॅड.प्रियेश जाधव व त्यांचे सहकारी वकिल यांनी ज्याप्रकारे न्यायपालिकेत भ्रष्ट पोलिसांना खरा चेहरा मिडियासमोर आणण्याचे कार्य केले तसेच निष्पापांचा फुकट बळी होऊन सजा होऊ नये म्हणुन ज्याप्रकारे पोलिसांशी भांडुन वकिल पत्रावर सह्या घेऊन कोर्टात आंदोलनकर्त्यांची बाजु मांडली ती कौतुकास्पद आहे. अॅड. जाधव यांचे कार्य सिद्ध करते की सुशिक्षित व्यक्ति भ्रष्ट आणि ढिम्म सिस्टमला योग्य वेळी सुधारण्याचा प्रयत्न करु शकतो. अॅड. जाधव व त्यांच्या वकिल सहकार्यांमुळे न्याय पालिकेवरचा नागरिकांना विश्वात उडण्यापासुन वाचवला आहे.

बदलापूरचे माजी नगराध्यक्ष अॅड. जाधव यांच्या या कार्यामुळे बदलापूरातील तमाम जनता आणि शिवसेना ठाकरे गटातील महिला पदाधिकारी, माता भगिनी आणि आंदोलनकर्त्यांच्या परिवाराने आभार मानल्याचे शिवसैनिक दत्ता गायकर यांनी बदलापूर विकासशी बोलतांना सांगितले.

ज्याप्रकारे कोर्टात पोलिसवाले आता दादागिरी करत आहे, हे असे जे काय भाजप सरकारच्या काळात होत आहे जेथे भ्रष्ट पोलिस प्रशासन कोर्टात सुद्धा आपली दादागिरी करतांना कायदा आणि सुव्यवस्थेचा भान ठेवत नाही हे नेमके कोणत्या ट्रेनिंग नंतर पोलिस भरतीत समावेश होऊन सरकारी नोकरी करत आहेत असा संशोधनाचा विषय आहे. सरकारी नोकरांना म्हणजेच पोलिसांना जर सरकारी नोकरीतुन मिळणार्या पगारातुन घर चालत नसेल तर निदान दुसरं तरी काही काम शोधावं कारण ज्याप्रकारे पोलिस प्रशासनात काम फक्त मनी आणि मसल पावर साठी भ्रष्ट पोलिस अधिकारी करत असणार तर अश्या राज्या आणि देशात भारतीय नागरिक कधीही सुरक्षित राहणार नाही.

ज्या पोलिस प्रशासनाने बलात्कार घटनेच्या सुरुवातीपासुन दिरंगाई दाखवली ज्यामध्ये सी.सी.टी.व्ही. फुजेट शाळेतुन गायब ही झाले, आरोपीला बरेच दिवस फरार राहण्यास मदत मिळाली त्याच नालायक आणि निर्लज्ज पोलिस खात्याने आंदोलनकर्त्यांना जामिन मिळु नये म्हणुन ज्याप्रकारे कोर्टात वकिलांशी बाचाबाची करण्याचा जो प्रकार केला त्यानंतर गृह खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कशाप्रकारची शिश्त महाराष्ट्र पोलिस खात्याला आहे असा जाब विचार बदलापूर विकास मिडियाने केले आहे.

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...