बदलापूर (महेश कामत)- मविआचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जेव्हा पत्रकार बातमी करता तेव्हा त्याच पत्रकारामधील एका महिला पत्रकारावर ज्याप्रकारे शिंदेचा पाळलेला कुत्रा गावगुंड वामन बारकु म्हात्रे बरळतो आणि शाब्दीक विनयभंगाचा प्रयत्न करतो हे पाहुन मुख्यमंत्री बदलापूर प्रकाणे अजुन किती शहरात अश्या पाळलेल्या गुंड्या सहाय्याने पत्रकारांवर दबाव आणणार असे आता सुज्ञ नागरिकांनी विचारायला सुरुवात केली आहे.
ज्या महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात सामान्य जनता सुरक्षित नाही, महिलांचा बलात्तार होते आणि अल्पवयीन मुलींचा विनयभंग आणि बलात्कारांच्या घटनेत वाढ होत असतांना गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी शिंदे सरकारचे पोलिस प्रशासन मुकबधीराची भुमिका बजावते हे आणि त्यातल्या त्यात शिंदे गटातील गुंडांकडून पत्रकारांवर दबावतंत्राचा वापर केला जातो हे पाहुन महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय असा प्रश्न नागरिकांना पडलाय.
एकनाथ शिंदे ज्या आता लाडकी बहिण योजनेच्या पाटीखाली महिलांची मत मिळवण्यासाठी म्हणुन विविध ठिकाणी कार्यक्रम करत आहेत ते देखील त्याच वेळी जेव्हा महाराष्ट्रात दर रोज अनेक अल्पवयीन मुलींवर आती तरुणींवर बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना समोर येत असल्याने शिंदे यांना महिलांच्या सुरक्षेची खरोखरच जाणिव आहे का? असा प्रश्न सामान्य महिलागण करत आहेत.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुळगांव बदलापूर नगरपरिषदेत जो काही अनेक वर्षांपासुन मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो आणि मुख्यमंत्री शिंदे याबाबत काही एक बोलत नाही त्याचे कारण म्हणजे हेच वामन म्हात्रे सारखे लोकप्रतिनिधी महिन्याचा हफ्ता मुख्यमंत्र्यांच्या नावानेही बांधून ठेवतात. त्यामुळे भ्रष्टाचार झाल्यानंतर ही आणि तक्रार केल्यानंतर ही कारवाई होत नाही.
अश्या प्रकारच्या आरोपीनंतर एक मात्र स्पष्ट होत आहे कि, बदलापूरात जे काही ‘’त्या’’ दिवशी घडले व महिला पत्रकारावर दबावतंत्राचा वापर वामन म्हात्रे कडून करण्यात आला तो फक्त बलात्कार की विनयभंगच्या शहानिशाच्या मुद्द्यावरुन नव्हे तर पत्रकार शिंदे सरकार विरोधात बातम्या करतात म्हणुन हे सर्व झाले अशी चर्चा आहे.
विशेष म्हणजे विविध माध्यमांमध्ये ज्याप्रकारे शिंदे गटातील लोकप्रतिनिधीने थेट म्हटले आहे कि, ‘बघा त्या महिला पत्रकाराने आजवर मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधात कश्या बातम्या केल्यात आहेत ते…’ त्यामुळे शहराची चर्चा आणि वामन म्हात्रे यांचे रागाच्या भरात निघालेले वाक्य एकच सांगते कि बदलापूरच्या दहशतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा कुठेतरी जबाबदार नक्कीच आहेत.
म्हात्रेच्या कृत्यानंतर लगेचच मुख्यमंत्री शिंदे यांनी मिडियाला माहिती दिली कि यावेळेस शिंदे सरकार म्हात्रेला पाठीशी घालणार नाही परंतु हे फक्त बोलण्यातच दिसले आहे कारण त्याच शिंदे सरकारच्या पोलिस प्रशासनाने ज्याप्रकारे पिडीत पत्रकार महिलेची तक्रार घेण्यास 2 दिवसांचा कालावधी लावला, तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी म्हात्रेला अटक करण्यात आले नाही, घटनेचे एफ.आय.आर. महाराष्ट्र पोलिसाच्या वेबसाईटवरुन गायब आणि जामिनावर सुटलेल्या म्हात्रे पुन्हा शहरात पुरावा नष्ट आणि साक्षिदारांची दिशाभुल करण्याचा खुलेआम प्रयत्न ह्यासर्वातुन हेच दिसत येते पाठीशी घालणार नाही हा जो काही शिंदेंनी मिडियाला सांगितले तो फक्त राजकिय स्टंट.
ज्याप्रकारे बदलापूरच्या वामन बारकु म्हात्रेच्या कृत्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची संपुर्ण महाराष्ट्र राज्यात टिकेला सुरुवात होत आहे यामुळे म्हात्रेंच आता शिंदेंच्या राजकिय कार्यरिर्दाला धक्का पोहचवणार की काय यावरच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.



