बदलापूरातील इल्लोजिकल दहशतीची परंपरा कधी थांबवणार?
बदलापूर (महेश कामत)- नुकताच झालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार या प्रकरणामुळे बदलापूर शहराची संपुर्ण देशात आज बदनामी झाली आहे. ह्या घटनेमुळे बदलापूर शहर आणि त्या शहरात होणारे अनेक गुन्हेगारी पार्श्वभुमीचे कार्य आता संपुर्ण देशाला दिसुन येत आहे. सुसंस्कृत बदलापूरात जे काही मागील अनेक वर्षात घडत आहे त्याने खरोखरच शहरात सुसंस्कृती आहे का असा आता प्रश्न विचारण्याची पाळी आली आहे.
एक घटना घडते ती म्हणजे अल्पवयीन मुलीवर बलात्कार, घटनेनंतर आरोपीला शिक्षा होऊ नये म्हणुन पोलिस प्रशासन आणि शाळा प्रशासन सुरुवातीला खुप प्रयत्न करते. पण जेव्हा हा विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांना माहिती मिळते व पिडीत परिवारासोबत ठामपणे ते उभे राहतात तेव्हा अचानक सत्ताधारी आणि खरवई गावचे काही रहिवाशी आरोपी ऐवजी त्याच्या घरच्यांनाच मारहाण करायला निघून जाते. घर तोडफोड करुन आरोपीच्या नातेवाईकांना रस्त्यावर येण्याची पाळी येते आणि तेवढेच नव्हे तर त्या परिवाराला बदलापूरातून हद्दपार होण्याची धमकी ही देतात. सदर घटनेची बातमी करणार्या महिला पत्रकाराला दुसरा गावगुंड लोकप्रतिनिधी वामन म्हात्रे अश्लील वाक्य बोलुन धमकी देतो. आंदोलन करणार्यांना हेच शिंदे गटातील राजकिय नेते मंडळी शिवीगाळ करुन मिडियावर त्या आंदोलनकर्त्यांची इमेज काय असा प्रश्न विचारते आणि पोलिस प्रशासन सुद्दा आरोपी ऐवजी आंदोलनकर्त्यांनाच धडा शिवकायला पुरेपुर प्रयत्न करते. हा सर्वातुन एक मात्र कळुन येते कि बदलापूरात ह्या सत्ताधार्यांना आणि पोलिस प्रशासनाना दोष मिळवण्यात आणि भविष्य सुधरवण्यात आजिबात इच्छा नाही.
आरोपी अक्षय शिंदे याला तर फाशी झालीच पाहिजे, त्याच्या पाठीशी घालणार्या शाळा प्रशासनावर कठोर कारवाई झालीच पाहिजे परंतु आरोपीच्या नातेवाईकांची ह्यात काय चुक होती जे त्यांना मारहाण व घर तोडफोड करण्यात आले. हा प्रकार ज्याने कोणी केला होता त्या गुंडांना पोलिस ठाणा फोडायची हिम्मत नव्हती म्हणुन गरिबाचं झोपडं फोडणं योग्य वाटत असेल परंतु ही बदलापूर शहराती अनलोजिकल दहशतीची परंपरा थांबवणार तरी कधी? असा प्रश्न आता विचारवंत जनता विचारत आहे.
एके ठिकाणी आरोपीची तक्रार नोंद होऊ नये म्हणुन ज्या पोलिस प्रशासनाने सिस्टमचा गैरवापर केला आणि तक्रारदार पिडीतेच्या मातेला दोन दिवस १२-१२ तास पोलिस ठाण्यात बसवुन ठेवले अश्या नालायक आणि निष्क्रीय पोलिस खात्याविरोधात बदलापूरकरांची हिम्मत कधी झाली का त्यांच्या पोलिस ठाण्याला फोडायची? ज्या शिंदे गटाच्या लोकप्रतिनिधी वामन म्हात्रेने बलात्कार घटनेचे वार्तांकन करत असलेल्या महिला पत्रकाराला पत्रकारिता करतांना डिस्टर्ब केले त्या वामन म्हात्रेला फटकवण्याची हिम्मत बदलापूरच्या त्या गुंडांमध्ये नाही मग ही असली हिम्मत फक्त गरिबांच्या मानवी हक्काची पायमळणी करण्यासाठीच येत असेल तर अश्यांना म्हणावे तरी काय. अश्या गुंडांना तर नपुंसक ही म्हणता येणार नाही कारण नपुंसक सुद्धा एक चांगल्या वैचाराने आपले जीवन जगतात आणि मानवी हक्काचा पालक करतात.
काही वर्षांपुर्वी याच शिंदे गटाच्या लोकप्रतिनिधी म्हात्रेच्या भाच्याने भावेश केशव म्हात्रे ने एका मुलीचे विनयभंग केले होते, त्यावेळेस गाववाल्यांची आज ज्याप्रकारे आरोपीच्या कुटुंबियांचे घर फोडले आणि त्यांच्या घराबाहेर काढले तसं काही त्यावेळेस करण्याचे सुचले नाही? ह्याने हे मात्र कळुन चुकतय कि हातापाही, तोडफोड आणि मारहाण हे बदलापूरातील गावगुंड फक्त आणि फक्त त्याच लोकांविरोधात करतात जी लोक ते गप्प म्हणुन सहन करतील.
स्थानिक पोलिस प्रशासन या सर्वाला प्रथम जबाबदार आहे, आरोपीने गुन्हा केला त्याला शिक्षा तर देता आलं नाही, आरोपीच्या कुटुंबियांना मारहाण झाली आणि तोडफोड झाली त्या गुन्हेगारांवर आज या 5 दिवसात काय कारवाई केली कारण गुन्हा तर खरवई गावच्या त्या गुंडांनी सुद्धा केलय घरात घुसुन मारहाण आणि तोडफोड करण्याचा गुन्हा. ह्या अश्या कारणामुळेच स्थानिक बदलापूर पूर्व , बदलापूर पश्चिम आणि बदलापूर ग्रामिण पोलिस खात्याना विकाऊ पोलिसवाले म्हणुन आज सामान्य जनता संबोधताना दिसत आहे.
स्थानिक पोलिस जेव्हा आपले कार्य योग्य रितीने बजावत नाही तेव्हाच गाव गुंडांना हिम्मत येते कोणाच्याही घरात घुसुन मारहाण, तोडफोड, मर्डर आणि इतर गुन्हे करण्याची आणि ह्या अश्या गुन्ह्यांना महाराष्ट्र पोलिस खाताच जबाबदार आहे.
डबल स्टैंडर्ड मेंटालीटी ठेवणार्या शिंदे गटातील बदलापूर स्थानिक राजकिय नेत्यांना आंदोलन झालेलं बघुन दंगत होणार की काय अशी खोटी नाटी भिती मिडियासमोर दाखवणारे हेच त्या आरोपीच्या घराची तोडफोड करणार्या विषयी का गप्प आहेत? खराची तोडफोड आणि आरोपीच्या परिवाराला मारहाण करुन बदलापूरातून बेदखल करुन काय त्या दोन्ही अल्पवयीन मुलींना न्याया मिळाले काय? की हे मारहाण आणि ठोकशाही न्याय देण्याासाठी नाही पण शहरात चनकोगिरी करण्यासाठी करण्यात आले याचा शोध आता स्थानिक पोलिस खात्याने लावालया हवे.
